कचरा वर्गीकरण न करणा-या 'एएलएम'वर पालिकेची कारवाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 October 2017

कचरा वर्गीकरण न करणा-या 'एएलएम'वर पालिकेची कारवाई


56 एएलएमची नोंदणी रद्द होणार -
मुंबई 23 Oct 2017 -- मुंबई महापालिकने ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट त्याच जागेत करण्याचे तसेच त्याचे खत निर्माण करण्याचे आदेश सोसायट्यांना दिले आहेत. त्या आधी या सोसायट्यांकडून कचरा उचलून विल्हेवाट लावण्यासाठी काही एएलएमची नेमणूक करण्यात आली होती. मात्र बहुसंख्य एएलएमने सोसायट्यांकडून कचरा उचलून त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली नसल्याचे निदर्शनास आल्याने 56 एएलएमची नोंदणी रद्द् करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरु केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महापालिका क्षेत्रातील कच-याचे प्रमाण कमी होऊन कचरा व्यवस्थापन साध्य व्हावे, हा उद्देश या उपक्रमामागे आहे. नोव्हेंबर 1997 पासून 'प्रगत परिसर व्यवस्थापन' ( एएलएम') या उपक्रमाची सुरुवात झाली. मात्र या 'एएलएम'द्वारे सध्या फक्त 30 ठिकाणी ओल्या कच-यापासून खत निर्मिती केली जात आहे. तर अनेक 'एएलएम' प्रत्यक्षात कार्यरत नसल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन महापालिका क्षेत्रातील सर्व 'एएलएम' च्या कार्यक्षमतेची तपासणी करण्याचे आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले होते. त्यानुसार अकार्यक्षम 'एएलएम' ची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय़ पालिकेने घेतला आहे.

या उपक्रमांतर्गत एक किंवा अधिक इमारतींचे प्रतिनिधी एकत्र येऊन अनेक ठिकाणी 'एएलएम' ची सुरवात झाली. सध्या महापालिका क्षेत्रात प्रगत परिसर व्यवस्थापनांतर्गत 7 हजारांपेक्षा अधिक इमारतींशी संलग्न आहेत. या 'एएलएम'द्वारे सध्या फक्त 30 ठिकाणी ओल्या कच-यापासून खत निर्मिती केली जात आहे. तर अनेक 'एएलएम' प्रत्यक्षात कार्यरत नसल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुऴे याची तपासणी सुरु आहे. 'घनकचरा व्यवस्थापन नियम – 2016' नुसार कच-याचे विभक्तीकरण व कच-यापासून खतनिर्मिती या बाबी 'एएलएम'च्या पुढाकाराने होणे अपेक्षित आहे. तसेच 'प्रगत परिसर व्यवस्थापन' ही संकल्पना मुळात कचरा व्यवस्थापनाला गती देण्यासाठी निर्माण करण्यात आली होती. मात्र अनेक 'एएलएम'द्वारे अपेक्षित काम केले जात नसल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत.

सध्या महापालिका क्षेत्रात 'एएलएम' द्वारे 30 ठिकाणी कच-यापासून खत निर्मिती केली जात आहे. यामध्ये 'ए, एच पूर्व, टी' या विभागांमध्ये प्रत्येकी 1 ठिकाणी, 'जी दक्षिण व आर मध्य' या विभागात प्रत्येकी २ ठिकाणी, 'के पूर्व' विभागात 3 ठिकाणी, 'एम पूर्व' विभागात 5 ठिकाणी, 'एच पश्चिम' विभागात 6 ठिकाणी तर 'आर उत्तर' विभागात 9 ठिकाणी ओल्या कच-यापासून खत निर्मिती करणा-या प्रकल्पांचा समावेश आहे. या अंतर्गत संबंधित 'एएलएम'द्वारे गेल्या वर्ष भरात कचरा विभक्तीकरण, कच-यापासून खतनिर्मिती व त्याचे प्रमाण आदी बाबींची तपासणी केली जाते आहे. वरील तपशीलानुसार तपासणी केल्यानंतर ज्या 'एएलएम'द्वारे अपेक्षित काम केले गेले नसेल, अशा 'एएलएम' ची नोंदणी तात्काळ रद्द करण्यात येऊन, नवीन 'एएलएम' ची नेमणूक करण्याची कार्यवाही देखील लगेचच सुरु केली जाणार आहे.

ज्या 'एएलएम'द्वारे या बाबींना प्रतिसाद मिळणार नाही, अशा 'एएलएम'ची नोंदणी तात्काळ रद्द करण्याचे आदेश नव्या परिपत्रकानुसार देण्यात आले आहेत. याबाबत सर्व 'एएलएम' यांना त्यांचे अहवाल 16 ऑक्टोबरपूर्वी सादर करण्याच्यादृष्टीने तातडीने पत्र पाठविण्याचे निर्देशही देण्यात आले होते. तसे न केल्यास कारवाई केली जाईल असेही कळवण्यात आले होते. मात्र तरीही अनेकांनी आदेश धाब्यावर बसवल्याचे तपासणी नंतर समोर आले आहे. त्यामुळे पालिकेने अशा एएलएमवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सद्या 56 एएलएमवर कारवाई सुरु केली असून येत्या काही दिवसांत नोंदणी रद्द् केली जाणार आहे. नोंदणी रद्द् झालेल्या एएलएमच्या जागी नव्याने एएलएमची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती पालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS