सफाई कामगारांच्या घराचा प्रश्न सोडवणार- अशिष शेलार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सफाई कामगारांच्या घराचा प्रश्न सोडवणार- अशिष शेलार

Share This

मुंबई । प्रतिनिधी 23 Oct 2017 -
मुंबई महानगर पालिकेच्या पालिकेच्या 28 हजार सफाई कामगाराना मालकी हक्काचे घर मिळावे म्हणून कामगारांची लढाई सुरू आहे. तर काही कामगारांची कुटंबे वासहतीच्या अवारात झोपड्‌यात राहात आहेत. राज्य सरकार या सर्वांना त्यांच्या हक्काचे घर देणार असून येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात याचा निर्णय घेण्यात येणार आहे. असे आश्वासन भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार अशिष शेलार यांनी दिले.

मुंबईतील गुजरामधील रूखी, मेघवाल समाजाचा दिवाळी स्नेहसंमेलन कार्यक्रम खार पश्चिम येथील पालिका वसाहतीत बनासकांटा रूखी समजाच्यावतीने स्नेहसंमलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी माजी नगरसेवक प्रकाश बोबडी, सफाई कामागर आयोगाचे ईश्वर वाघेला, बनासकाटा गुजीराती रूखी समाज महापंचायत अध्यक्ष रतिलाल सोलंकी इश्वर वाघेला, रूखी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी रूखी समाजाच्या खार विभागातील नवनिर्वाचित अध्यक्ष धनजी पुरबीय यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचे आमदार शेलार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

योवळी आमदार शेलार म्हणाले की, पालिकेच्या 28 हजार सफाई कामगाराना मालकी हक्काचे घर मिळावे म्हणून अनेक संघटना आणि आमदार भाई गिरकर प्रयत्न करत आहेत. पालिका कामागरांचा घराचा प्रश्न डॉ. आंबेडकर श्रम साफल्य आवास आश्रय योजनेद्वारे सोडविण्यात येणार आहे. तसचे वसाहतींच्या आवारत असणाऱ्या झोपडीत राहाणाऱ्या कामगारांच्या कुटुंबानाही झोपु योजनेअंतर्गत घर देण्यात येणार आहे. म्हणून नागपूर येथे होणाऱ्या येत्या हिवाळी अधिवेशनात पालिकेतील कामगारांच्या घरांचा प्रश्न सोडविण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, असे आश्वासन शेलार दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 मध्ये सर्वांना घर देण्याचे मान्य केले असल्याने आमचे सरकार पालिकेतील कामगारांना त्यांचे हक्काचे घर दिल्याशिवाय राहाणार नाही. असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages