रासायनिक हल्ल्याचा सामना करण्यासाठी अग्निशमन दलात 'हॅजमॅट' वाहन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रासायनिक हल्ल्याचा सामना करण्यासाठी अग्निशमन दलात 'हॅजमॅट' वाहन

Share This

मुंबई । प्रतिनिधी -
मुंबईत रासायनिक हल्ला झाल्यास त्यावेळची परिस्थिती हाताळण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाकरिता 'हॅजमॅट' हे विशेष वाहन खरेदी करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. या वाहनामध्ये विशेष प्रकारची उपकरणे, विशेष प्रकारचा गणवेश, केमिकल न्यूट्रीलायझर, विशिष्ठ प्रकारची साधने इत्यादींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे या वाहनामध्ये अनुउत्सर्जन झाल्यास ते तपासण्याकरिता विशिष्ठ उपकरणे उपलब्ध आहेत. सदर वाहन जगामध्ये रासायनिक आपत्कालीन परिस्तिथीच्या वेळी वापरण्यात येते.

मुंबई शहराची गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. दैनंदिन वाढणारी लोकसंख्या, बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये व इतर वाढणाऱ्या आस्थापनांमुळे अपघातांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील तेलशुद्धीकरण कारखाने, रासायनिक खत कारखाने व इतर औद्योगिक उद्योगांमुळे वेळोवेळी रासायनिक अपघातांना अग्निशमन दलाला तोंड द्यावे लागते. असे रासायनिक अपघात झाल्यास त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी ' हॅजमॅट ' हे विशेष प्रकारचे वाहन आहे. संपूर्ण जगामध्ये रासायनिक अपघात व रसायनिक आपत्कालीन परिस्तिथी हाताळण्यासाठी सदर वाहनांचा उपयोग केला जातो. सदर वाहनासाठी पाच वर्षांच्या देखभालीसह एकूण सुमारे सव्वा आठ कोटी खर्च पालिकेला येणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages