म्हाडा सदनिकेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता २३ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

म्हाडा सदनिकेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता २३ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

Share This

मुंबई, दि. १८ ऑक्टोबर २०१७ :-
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) मुंबई विभागातील विविध वसाहतीतील ८१९ सदनिकांच्या सोडतीसाठी नागरिकांच्या सोयीकरिता नोंदणीकृत अर्जदारांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत दि. २४ ऑक्टोबर २०१७ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

नवीन वेळापत्रकानुसार म्हाडाच्या htpps://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्जासाठी नोंदणी दि. २३ ऑक्टोबर २०१७ रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटापर्यंत करता येणार आहे. नोंदणीकृत अर्जदारास नोंदीत माहितीमध्ये बदल दि. २४ ऑक्टोबर २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत करता येणार आहे. नोंदणीकृत अर्जदारांसाठी ऑनलाईन अर्ज दि. २४ ऑक्टोबर २०१७ रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटापर्यंत सादर करता येणार आहे. NEFT / RTGS द्वारे अनामत रक्कम भरणा करण्यासाठी चलन निर्मिती दि. २५ ऑक्टोबर २०१७ रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटापर्यंत करता येणार आहे. ऑनलाईन पेमेन्ट स्वीकृती दि. २६ ऑक्टोबर २०१७ रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटापर्यंत करता येणार आहे. NEFT / RTGS द्वारे अनामत रक्कम भरणा दि. २६ ऑक्टोबर २०१७ रोजी संबंधीत बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत करता येणार आहे.

या व्यतिरिक्त दि. १५ सप्टेंबर २०१७ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या सदनिका सोडतीच्या जाहिरातीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अधिक माहितीकरिता https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन म्हाडातर्फे करण्यात आले आहे. सोडतीकरिता लाभलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल म्हाडातर्फे अर्जदारांचे आभार मानण्यात येत आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages