मुंबई - जेष्ठ नेते नारायण राणे यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषद घेऊन "महाराष्ट्र स्वाभिमान पक्षा"ची घोषण केली आहे. आपला पक्षाचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र हेच असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केल.
दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी दिलेल्या भाषणावर घणाघाती टीका राणे यांनी केली आहे. काश्मिरमध्ये भाजप लाचार आहे असं म्हणताना जीएसटी, शेतकरी आत्महत्या यासारख्या मुद्द्यांवर राज्यात लाचार नाही का असा प्रश्न राणेंनी उपस्थित केला. तसंच नोटाबंदीमुळे भ्रष्टाचार कमी झाला नाही असं काल ठाकरे म्हणाले होते. त्यावर टीका करताना मुंबई महानगरपालिकेत किती भ्रष्टाचार कमी केला असा प्रश्न राणेंनी विचारला.पंतप्रधानांबाबत आपण कशा भाषेत बोलतो अशीही मार्मिक टीका त्यांनी ठाकरेंवर केली. तसंच उद्धव ठाकरेंना नैतिक अधिकार नाही असंही ते म्हणाले.
शिवसेना मनसेवर टिका -
भाजपने हकललं तरी शिवसेना सत्ता सोडणार नाही अशी टीका राणेंनी केली आहे. तसंच शिवसेनेच महाराष्ट्राच्या सत्तेतील योगदान शून्य आहे.तसंच सामाजित आर्थिक कुठल्याच क्षेत्रात शिवसेनेनं काहीही काम केलेलं नाही असा आरोप राणेंनी केला आहे. मुंबईतला मराठीचा टीका कमी होण्यासाठी शिवसेनाच जबबाबदार आहे असं विधानही राणेंनी केलं. राज ठाकरेंच्या धमक्या पोकळ असल्याचा उल्लेख राणेंनी केला. राज ठाकरेंनी आतापर्यंत काय विधायक काम केलं, असा प्रश्न राणे यांनी विचारला आहे.