मुंबई - एल्फिस्टन रोड स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीच्या दिवशी गरबा खेळण भाजप खासदार किरीट सोमय्यांना चांगलाच महागात पडला आहे. भाजपन रेल्वे सुधारणांसाठी बनवलेल्या समितीपासून रेल्वेचे प्रश्न दिल्ली दरबारी मांडणाऱ्या खासदार किरीट सोमय्यांना लांब ठेवण्यात आले आहे. भाजपाने सोमय्या यांना हि शिक्षा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाश्याबाबत सर्वत्र दुःख व्यक्त केले जात असताना सोमय्या मात्र गरबा खेळण्यात मग्न असल्याचा व्हिडीओ वायरल झाला होता. यामुळे मुंबईकर नागरिकांमध्ये सोमय्या यांच्या विरोधात वातावरण निर्माण झाल्याने त्यांना समितीमध्ये स्थान देण्यात आलेले नाही. एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वे प्रश्नावर पाठपुरावा करण्यासाठी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली भाजपची एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत आशिष शेलारांसह मधू चव्हाण, भाई गिरकर, प्रभाकर शिंदे यांचा समावेश करण्यात आला आहे.