एनसीपीए ते वरळी सी - लिंक 22 किमीचा सायकल ट्रॅक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

एनसीपीए ते वरळी सी - लिंक 22 किमीचा सायकल ट्रॅक

Share This

मुंबई | प्रतिनिधी -
दक्षिण मुंबईतील चर्चगेट स्टेशनच्या जवळ असणा-या एनसीपीए पासून ते वरळी सी लिंक पर्यंत सायकल ट्रॅक तयार करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. हा सायकल ट्रॅक सुमारे 11 किमी च्या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा म्हणजेच 22 किमी एवढ्या अंतराचा असणार आहे. दर रविवारी व काही शनिवारी सकाळी 6 ते 11 या दरम्यान सायकल ट्रॅकचे ट्रॅकचे व्यवस्थापन करण्यासाठी इच्छुकांकडून प्रस्ताव मागवले असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. 

हा सायकल ट्रक एनसीपीए - नेताजी सुभाष मार्ग (मरिन ड्राइव्ह) – बाबुलनाथ – गोपाळराव देशमुख मार्ग (पेडर रोड) – ऍनी बेझंट मार्ग – खान अब्दुल गफ्फार खान मार्ग – राजीव गांधी सागरी सेतू (वरळी सी-लिंक) असा असणार आहे. प्रस्तावित करण्यात आलेल्या या सुमारे 22 किमीच्या सायकल ट्रॅकसाठी पायाभूत सुविधा महानगरपालिकेतर्फे तयार केल्या जाणार आहेत. तर दर रविवारी व काही शनिवारी सायकल ट्रॅकचे व्यवस्थापन, संचलन व समन्वय करण्यासाठी महापालिकेने इच्छुक उद्योग समूह / स्वयंसेवी संस्था इत्यादींकडून प्रस्ताव मागविले आहेत. निवड होणा-या संस्थेला हे काम प्रायोजित करण्याच्या अटी व शर्तींवर जाहिरात करता येणार आहे, असेही दिघावकर यांनी सांगितले. याबाबत इच्छुक उद्योग समूह / स्वयंसेवी संस्था आदींनी 13ऑक्टोबर 2017 पर्यंत महापालिकेच्या 'ए' विभाग कार्यालयाशी संपर्क साधून आपले प्रस्ताव सादर करावे असे आवाहनही पालिकेने केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages