मुंबई - कुरारगाव महोत्सव २०१७ अंतर्गत ‘पुनर्जन्म’ दशावतारी नाट्यप्रयोग श्री कलाभूषण दशावतार नाट्यमंडळाने सादर केला. हे नाटक म्हणजे रसिकांसाठी एक सांस्कृतिक मेजवानीच ठरली आहे. पुनर्जन्म’ नाटय़प्रयोगासाठी कुरार, दिंडोशी विभागातील नाटय़रसिकांनी शेकडोच्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पावसाची रिपरिप सुरू असताना देखील दशावतारी नाटकांना होणारी प्रचंड गर्दी पाहता ही दिवाळी कुरारवासीयांसाठी मनोरंजनाची असल्याचे मत आमदार सुनील प्रभू यांनी व्यक्त केले.
शिवसेना नेते, खासदार गजानन किर्तीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विभागप्रमुख, आमदार सुनील प्रभू यांच्या पुढाकाराने या भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आज शुक्रवारी १३ ऑक्टोबरला शिवसेना विभाग प्रमुख, आमदार, माजी महापौर मुंबई सुनिल प्रभु यांच्या हस्ते या भव्य महोत्सवाचे उद्घाटन झाले. कोकणी मेवा, आकाश पाळणे, मनोरंजन, बालनगरी, गृहपयोगी वस्तू आणि खाद्यपदार्थांची रेलचेल या महोत्सवात असल्याने कोकणी माणसाची गावाकडची आठवण जागी होत आहे.
दिवाळीचा आनंद व्दिगुणित करण्यासाठी शिवसेना दिंडोशी विधानसभातर्फे यंदाही कुरार महोत्सव २०१७ चे आयोजन करण्यात आले आहे. १३ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर या कालावधीत सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत मालाड पूर्व, कुरार गाव येथील महर्षी बुवा साळवी मैदानाच्या बाजूला हा भव्य महोत्सव भरला आहे या महोत्सवाच्या निमित्ताने श्री कुलभूषण दशावतारी नाट्य मंडळने या नाट्यप्रयोगाचे आयोजन केले आहे. भगवान शंकर आणि देवी पार्वतीच्या भक्तांची कथा नाटकामध्ये दाखवली गेली. यानिमित्ताने कोकणच्या कला संस्कृतीचे वैभव जपण्याचे काम या कुरार महोत्सवाच्या माध्यमातून केले जात आहे. त्यामुळे मुंबईकर चाकरमान्यांनाही मुंबईतच आपल्या संस्कृतीची मेजवानी मिळत असल्याचे गौरवोद्गार आमदार सुनील प्रभू यांनी काढले. यावेळी सुनील प्रभू यांच्या हस्ते सर्व दशावतार कलाकारांचा सत्कारही करण्यात आला.
यावेळी विधी समिती अध्यक्ष सुहास वाडकर, स्थापत्य समिती (उपनगर) अध्यक्ष तुळशीराम शिंदे, नगरसेवक आत्माराम चाचे, आरपीआयचे पोपट घनवट, माजी नगरसेवक प्रशांत कदम, गणपत वारिसे, सुनिल गुजर, उपविभागप्रमुख विष्णू सावंत, विधानसभा संघटक अनघा साळकर, महिला उपविभाग संघटक पूजा चौहान, रीना सुर्वे, नमिता कल्याणकर, शाखाप्रमुख प्रदीप निकम, प्रभाकर राणे, कृष्णा देसाई, राजू घाग, भाई परब, संदीप जाधव, शाखा संघटक शोभा काळे, ऋचित आरोसकर, संजीवनी रावराणे, गीतांजली घाडी, शाखा समन्वय कृतिका शिर्के, सानिका शिरगावकर आदी उपस्थित होते.