त्या फुटीर सहा नगरसेवकांचा फैसला १४ नोव्हेंबरला ? - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

त्या फुटीर सहा नगरसेवकांचा फैसला १४ नोव्हेंबरला ?

Share This

मुंबई । प्रतिनिधी - 
मनसेला जय महाराष्ट्र करून शिवसेनेत सामील झालेल्या सहा नगरसेवकांची येत्या १४ नोव्हेंबरला कोकण विभागीय आयुक्तांपुढे सुनावणी होणार आहे. नियमानुसार यावर कोकण आयुक्तांकडून अभिप्राय दिला जाणार आहे. यानिर्णयावरच अनेक राजकीय गणिते अवलंबून असल्याने कोकण आयुक्त काय निर्णय घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

मनसेतील सात पैकी सहा नगरसेवक शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय घडामाेंडीना वेग आला आहे. या नगरसेवकांची कोंडी करण्यासाठी मनसेने पुढाकार घेत कोकण विभागीय आयुक्तांना पत्र व्यवहार केला. पक्षांतर केलेल्या नगरसेवकांना पालिकेतील कोणत्याही समित्यांच्या बैठकांमध्ये प्रवेश देऊ नये, प्रस्तावावर मतदान करण्यापासून बंदी घालावी, सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. यापैकी सदस्यत्व रद्द करण्याची कोकण आयुक्तांनी फेटाळून लावत, अन्य मागण्याबाबंत लेखी स्वरुपात म्हणणे मांडण्याची सूचना संबंधित नगरसेवकांना केली होती. मागील आठवड्यात पक्षांतर केलेल्या नगरसेवकांनी आपले लेखी म्हणणे कोकण आयुक्तांकडे मांडल्याचे समजते. सध्या हे प्रकरण कोकण आयुक्तांच्या कायद्याच्या कचाट्यात अडकले आहे. यावर येत्या १४ नोव्हेंबर २०१७ रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे. या सुनावणीला मनसेच्या याचिकाकर्त्यांना देखील बोलाविण्यात येणार आहे. मनसे पदाधिकारी व पक्षांतर केलेल्या नगरसेवकांच्या उपस्थितीत ही सुनावणी होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान, दोन्हींकडील सदस्य काय कोकण आयुक्तांकडे काय बाजू मांडतात. या बाजू एेकूण घेतल्यानंतर कोकण विभागीय आयुक्त पुढील निर्णय घेतील.

भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेने मनसेचे सहा नगरसेवक फोडून आपल्या गोटात सामिल केले. त्यामुळे हे प्रकरण शिवसेनेसाठी खूपच प्रतिष्ठेचे बनले आहे. कायद्यानुसार दोन तृतीयांश सदस्य पक्षांतर करु शकतात. त्यामुळे कायदेशीर दृष्ट्ट्या आमची बाजू मजबूत असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. मात्र, मनसेने यावर हरकत घेतल्याने कोकण आयुक्तांकडे येत्या १४ नोव्हेंबरला सुनावणी होत आहे. या सुनावणीबाबतचा अंतीम निर्णय सहा नगरसेवकांच्या बाजूने लागल्यास शिवसेनेने येत्या २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पालिकेच्या महासभेत शक्तीप्रदर्शन करण्याची जोरदार तयारी केली आहे. सहा नगरसेवकांसह शिवसेनेचे मिळून ९४ नगरसेवक भगवे फेटे बांधून सभागृहात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages