पालिका आयुक्तांसह तीन पोलीस अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिका आयुक्तांसह तीन पोलीस अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटी

Share This

उल्हासनगर 14 Nov 2017 -
उल्हासनगर महापालिका आयुक्तांसह तीन पोलीस अधिकार्‍यांवर कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने एका सुनावणी दरम्यान अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाने महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

फेब्रुवारीमध्ये झालेल्या उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या रिपाइं (आठवले गट), भारिप, पीआरपी यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्यांना दालने व सोयीसुविधा पालिकेने पुरवल्या होत्या. मात्र अचानक या पाचही पक्षांची दालने आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी 6 जुलै रोजी सील केली होती. या प्रकाराने रिपाइंसह पाचही पक्षांचे नगरसेवक संतप्त झाले होते. अवैधपणे दालने बळकावल्याने ही कारवाई केल्याचे त्यावेळी आयुक्तांचे म्हणणे होते. यातून वाद झाला होता आणि प्रकरण कोर्टात गेले होते. यावर मंगळवारी सुनावणी होऊन न्यायालयाने आयुक्त निंबाळकर, परिमंडळ-4 चे पोलीस उपायुक्त अंकित गोयल, सहाय्यक पोलीस आयुक्त विकास तोटावार आणि पीआय अविनाश काळदाते या चौघांविरोधात अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिल्याची माहिती भालेराव यांचे वकील अ‍ॅड. जय गायकवाड यांनी दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages