लक्ष्मीबाग नाल्यावरील फक्त पात्र झोपड्यांवर कारवाई करण्यास पालिकेला यश - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

लक्ष्मीबाग नाल्यावरील फक्त पात्र झोपड्यांवर कारवाई करण्यास पालिकेला यश

Share This

मुंबई । प्रतिनिधी 13 Nov 2017-
घाटकोपर पंतनगर संजय गांधी नगर येथील लक्ष्मीबाग नाला रुंदीकरणात बाधित होणाऱ्या झोपड्यांवर सोमवारी पालिकेने कारवाई केली. मात्र या ठिकाणी कारवाई करण्यास आलेल्या पालिकेच्या पथकाला येथील रहिवाश्यांच्या तीव्र असंतोषाला सामोरे जावे लागल्याने बाधित झोपड्यांपैकी फक्त पात्र झोपड्यांवर कारवाई करण्यास यश आले आहे.

घाटकोपर पंतनगर येथील लक्ष्मीबाग नाला रुंदीकरणात लक्ष्मी ते मार्लेश्वर या विभागातील ११०० झोपड्यापैकी फक्त ४८ झोपड्या पात्र ठरवण्यात आल्याचे आहेत. तर या नाल्यावरील संजय गांधी नगर येथील फक्त १५ झोपड्या पात्र ठेवण्यात आल्या आहेत. झोपड्या पात्र अपात्र करताना योग्य निकष लावले नसल्याने संजय गांधी नगर सह इतर विभागातील झोपडीधारकांमध्येही नाराजी पसरली होती. संजय गांधी नगरमध्ये पालिका कारवाई करण्यास येणार याची माहिती मिळताच शेकडो रहिवाशी पालिका अधिकाऱ्यांना आमची घरे अपात्र का केली याचा जाब विचारण्यासाठी एकत्र आले होते.

या कारवाई आधी जे ३० ते ४० वर्षे या ठिकाणी राहतात त्यांची घरे अपात्र ठरवण्यात आली आहेत. आणि आता नव्याने आलेले तसेच राजकीय पक्षांशी संबंध असलेल्या रहिवाश्यांची घरे पात्र कशी झाली ? आम्हाला नोटिसा आल्या नाहीत मग कारवाई कशी करता ? आम्हाला घरे कुठे देणार ? आमच्या मुलांच्या शाळांचे कॉलेजचे काय होणार ? आमची मते निवडणुकीत चालतात मग आमची घरे का चालत नाहीत ? असे अनेक प्रश्न उपस्थित केले. तर या कारवाई दरम्यान स्थानिक नगरसेविका राखी जाधव या पात्र झोपडी धारकांना हाताशी धरून राजकारण करत असल्याचा आरोप येथील रहिवाश्यांनी केला आहे.

यावर संजय गांधी नगर येथील फक्त १५ पात्र झोपडीधारकांची घरे तोडली जाणार असून इतरांची घरे तोडली जाणार नसल्याचे आश्वासन पंतनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल्ल फडके यांनी देऊन रहिवाश्याना शांत करण्याचा प्रयत्न केला. यानंतर पात्र झोपडीधारकांची घरे तोडण्यात आली. या तोडकी कारवाई नंतर पालिकेच्या एन विभागाच्या सहाय्यक आयुक्त भागश्री कापसे यांनी २०१२ च्या जीआर नुसार इतर झोपडीधारकांना पात्र करण्याची कारवाई सुरु आहे. इतरांनांही लवकरच पात्र केले जाईल असे आश्वासन दिल्याचे येथील रहिवाश्यांनी सांगितले.

पात्र झोपडीधारक घरे खाली करण्यास तयार - 
जे पात्र झोपडीधारक आहेत ते लक्ष्मी नगर नाल्यावर भिंत व्हावी म्हणून तयार आहेत. आपली घरे ते स्वतःहून तोडण्यास सांगत आहेत. मात्र काही लोक इथे शायनिंग करण्यासाठी जमा झाले आहेत. ते कोण लोक आहेत ते माहीत नाही. आता फक्त पात्र झोपडीधारकांची घरे तोडणार आहे.
राखी जाधव - स्थानिक नगरसेविका

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages