मनसेच्या सहा फुटीर नगरसेवकांची मंगळवारी सुनावणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 November 2017

मनसेच्या सहा फुटीर नगरसेवकांची मंगळवारी सुनावणी


मुंबई | प्रतिनिधी 13 Nov 2017 -
मनसेला जय महाराष्ट्र करून शिवसेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांबाबत मंगळवारी (१४ नोव्हेंबर) कोकण उप विभागीय आयुक्तांसमोर सुनावणी होणार आहे. दुपारी दोनच्या सुमारास हे सर्व सहा फुटीर नगरसेवक कोकण विभागीय आयुक्तांसमोर प्रत्यक्ष हजार राहणार आहेत. कोंकण आयुक्तांच्या अभिप्रायवर राजकीय समीकरणे बदलणार असल्याने या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मनसेचे सात पैकी सहा नगरसेवक फुटून शिवसेनेसोबत सोबत केले. हा प्रकार मनसेच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी न्याय हक्कासाठी कायदेशीर मार्ग स्वीकारून त्या नगरसेवकांची कोंडी करण्यावर भर दिला. पालिकेतील कोणत्याही समित्यांच्या बैठकांमध्ये प्रवेश देऊ नये, प्रस्तावावर मतदान करण्यापासून बंदी घालावी, सदस्यत्व रद्द करावे, आदी मागण्या कोकण विभागीय आयुक्तांकडे केल्या. यापैकी सदस्यत्व रद्द करण्याची कोकण आयुक्तांनी फेटाळून लावली. तर अन्य बाबी तपासून पाहण्यासाठी मंगळवारी संबंधित नगरसेवकांना कोकण विभागीय आयुक्तांनी सुनावणीसाठी बोलवले आहे. या सुनावणीला मनसेच्या याचिकाकर्ते देखील उपस्थित राहणार आहे. त्यांच्या उपस्थितीत पक्षांतर केलेले नगरसेवक आपली बाजू मांडतील. यानंतर कोकण आयुक्त आपला निर्णय जाहीर करतील. दरम्यान, मागील दोन आठवड्यापूर्वी त्या सहा नगरसेवकांनी लेखी म्हणणे कोकण विभागीय आयुक्तांपुढे मांडले. मात्र हे प्रकरण कायद्याच्या कचाट्यात अडकून आहे.

२३ नोव्हेंबरला सभागृहात शक्तिप्रदर्शन - 
भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेने मनसेचे सहा नगरसेवक फोडले. मनसेने यावर हरकत घेतल्याने हे प्रकरण प्रतिष्ठेचे बनले होते. सध्या शिवसेनेचे अधिकृत ८४ आणि अपक्ष ३ असे ८७ सदस्य आहेत. मात्र सुनावणीबाबतचा अंतीम निर्णय सहा नगरसेवकांच्या बाजूने लागल्यास शिवसेनेचे पालिकेतील पक्षीय बळाबल वाढणार आहे. त्यामुळे शिवसेनेने येत्या २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पालिकेच्या महासभेत शक्तीप्रदर्शन करण्याची जोरदार तयारी केली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS