हँकॉक ब्रिजचे बांधकाम 15 दिवसांत सुरू होणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

हँकॉक ब्रिजचे बांधकाम 15 दिवसांत सुरू होणार

Share This

मुंबई | प्रतिनिधी 14 Nov 2017 -
भायखळा व सँडहर्स्ट रोड दरम्यानचा ऐतिहासिक हँकॉक ब्रिज दोन वर्षांपूर्वी पाडण्यात आला होता. सँडहर्स्ट रोड आणि भायखळामधील 135 वर्षे जुना असलेला पूल तोडण्यात आल्यानंतर पुनर्बांधणीचे काम मात्र तब्बल दोन वर्षे रखडले होते. तब्बल दोन वर्षे न्यायालयाच्या लढ्यानंतर हँकॉक ब्रिजच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या 15 दिवसांत या पुलाचे बांधकाम सुरू होणार आहे.

भायखळा व सँडहर्स्ट रोड दरम्यानचा हँकॉक पूल दोन वर्षांपूर्वी पाडल्याने पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. पादचारी पूल नसल्याने प्रवाशांना जीव धोक्यात घालून रूळ ओलांडून सँडहर्स्ट रोड स्थानक गाठावे लागते. यामुळे अपघात होण्याची भीती होती. हँकॉक पूल दोन वर्षांपूर्वी पाडल्याने पादचाऱ्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. याच दरम्यान पालिकेने पालिकेने काढलेल्या टेंडरमध्ये गोंधळ झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला होता. मात्र आता न्यायालयाने जनतेच्या हितासाठी पुलाच्या बांधकामाची प्रक्रिया सुरू करण्यास पालिकेला परवानगी दिली असल्याची माहिती पालिकेच्या अधिकार्‍याने दिली. हँकॉक पुलाबरोबरच विक्रोळी रेल्वे ओव्हर ब्रिज, यारी रोड आणि लोखंडवाला जंक्शन यांना जोडणार्‍या पुलाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच वांद्रे पूर्व येथील मीठी नदीवरील पुलाचे चौपदीकरणही लवकरच होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages