जीएसटीबाबत लॉटरी विक्रेते आंदोलन छेडणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

जीएसटीबाबत लॉटरी विक्रेते आंदोलन छेडणार

Share This

मुंबई / मुकेश धावडे / 23 Nov -
केंद्र, राज्य सरकार आणि जीएसटी कौन्सिल यांना लॉटरीवरील जीएसटी कमी करण्याची मागणी करण्यात आली. मात्र त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे लॉटरी विक्रेत्यांमध्ये सरकारविरोधात संताप पसरला आहे. हा संताप व्यक्त करण्यासाठी सरकार विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा लॉटरी रोजगार बचाव महाकृती समितीच्या समन्वयक स्नेहल शाह यांनी दिला आहे.

सरकारने लॉटरीवर 28 टक्के जीएसटी लागू केल्यामुळे विक्रेत्यांना व्यवसाय करणे मुश्कील झाले आहे. लाखो लोकांचा हक्काचा रोजगार गेला आहे. यामुळे त्याच्या कुटूंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारचाही  करोडो रुपयांचा महसूल पाण्यात गेला आहे. असे असतानाही सरकार या गंभीर समस्येकडे वारंवार दुर्लक्ष करीत असल्याचे शाह यांनी सांगितले. लॉटरी व्यवसायाचे कंबरडे मोडल्यानंतर वेगवेगळ्या अनैतिक धंद्याला बळ मिळाले असून मटका व्यवसाय तेजीत सुरू झाला असल्याचा आरोप शाह यांनी केला. ही गंभीर समस्या बनली असल्याने सरकारने यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे असल्याचे शाह यांनी सांगितले. 

आज लॉटरी विक्रेत्यांवर 28 टक्के जीएसटी मुळे मोठे संकट ओढवले आहे. सरकारच्या जीएसटी कराला लॉटरी विक्रेत्यांचा विरोध नाही पण लॉटरी विक्रेत्यांचे हित लक्षात घेऊन सरकारने लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा. अन्यथा लॉटरी रोजगार बचाव महाकृती समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे शाह म्हणाल्या. लॉटरी विक्रेत्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास सरकार विरोधात दिल्ली येथील जंतर मंतर येथे उग्र आंदोलन व निदर्शने करण्यात येतील असा इशारा स्नेहल शहा यांनी दिला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages