ज्‍येष्‍ठ नागरिकच देशाची खरी संपत्‍ती – महापौर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 November 2017

ज्‍येष्‍ठ नागरिकच देशाची खरी संपत्‍ती – महापौर


ज्‍येष्‍ठ नागरिकांना बस भाडयात 50 टक्‍के सुट -
मुंबई । प्रतिनिधी 11 Nov 2017 -
बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या विरंगुळा केंद्रात येणाऱया ज्‍येष्‍ठ नागरिकांच्‍या मार्गदर्शनातूच तरुण पिढीला भविष्‍याची दिशा मिळणार असल्‍याने ज्‍येष्‍ठ नागरिकच देशाची खरी संपत्‍ती असल्‍याचे प्रतिपादन मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी केले. यावेळी ज्‍येष्‍ठ नागरिकांना ‘बेस्‍ट’ च्‍या बस भाडयामध्‍ये यापुढे 50 टक्‍के सुट देणार असल्‍याचे महापौरांनी यावेळी जाहिर केले. जागतिक ज्‍येष्‍ठ नागरिक दिन सोहळा आणि ज्‍येष्‍ठ नागरिकांचा सत्‍कार समारंभ माटुंग्याच्‍या यशवंत नाटय मंदिरात आयोजित करण्‍यात आला होता, त्‍यावेळी ज्‍येष्‍ठ नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते.

महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यावेळी मार्गदर्शन करताना म्‍हणाले की, ज्‍येष्‍ठ नागरिकांचा सांस्‍कृतिक कार्यक्रम बघितल्‍यानंतर सादरकर्ते ज्‍येष्ठ न वाटता तरुण असल्‍याचे जाणवले. त्‍यामुळे आपण वयाने जरी मोठे असलात तरी मनाने तरुण राहले की वयाची जाणिव होत नाही, याचे मुर्तीमंत उदाहरण म्‍हणजे हा कार्यक्रम असल्‍याचे महापौरांनी सांगितले. प्रत्‍येक मनुष्‍याने आपल्‍या आयुष्‍यात तारुण्‍य, संपत्‍ती, सौंदर्य, सत्‍ता याचा कधीही अहंकार न बाळगता आपण समाजव्‍यवस्‍थेचे एक घटक असून लोककल्‍याण हा आपला उद्देश असला पाहिजे, असेही महापौरांनी यावेळी सांगितले. प्रत्‍येक ज्‍येष्‍ठ नागरिकाला चांगले आरोग्‍य लाभो अश्‍या शुभेच्‍छा महापौरांनी शेवटी दिल्‍या.

याप्रसंगी सार्वजनिक आरोग्‍य समिती अध्‍यक्षा रोहिणी कांबळे, महिला व बालकल्‍याण समिती अध्‍यक्षा सिंधू मसुरकर, माजी महापौर तथा नगरसेविका स्‍नेहल आंबेकर, नगरसेवक समाधान सरवणकर, नगरसेविका हर्षला मोरे, तेजिस्‍वि‍नी घोसाळकर, गिता सिंघण, राजराजेश्‍वरी रेडकर, मरियमा तेवर, ज्‍येष्‍ठ नागरिक संघाचे अध्‍यक्ष विजय औंधे, ‘ बी’ विभागाचे सहाय्यक आयुक्‍त उदयकुमार शिरुरकर, सहाय्यक आयुक्‍त ( नियोजन) डॉ. संगीता हसनाळे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी ज्‍येष्ठ नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.

महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्‍या हस्‍ते प्रारंभी वयाचे 90 वर्ष पूर्ण केलेल्‍या सखाराम पाताडे, एम.के. फटनाणी, विरप्‍पा काकनकी, एस.पी.गायकवाड, प्रमिला देशपांडे, सुनंदा बागकर, रामकृष्‍ण केणी, मधुकर कातकर, कमला वाटणकर, सरिता शहा, जैन नायगण या ज्‍येष्‍ठ नागरिकांचा सत्‍कार करण्‍यात आला. सहाय्यक आयुक्‍त (नियोजन) डॉ.संगीता हसनाळे यांनी महापौरांच्‍या अध्‍यक्षतेखाली लवकरच ज्‍येष्‍ठ नागरिक संघाची स्‍थापना करण्‍यात येत असून वर्षातून संघाच्‍या दोन बैठका घेणार असल्‍याचे आश्‍वासन त्‍यांनी यावेळी उपस्‍थि‍तांना दिले.

Post Bottom Ad

JPN NEWS