मेट्रोसाठी 444 झाडे तोडणार - महापौर, गटनेते करणार पाहणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 November 2017

मेट्रोसाठी 444 झाडे तोडणार - महापौर, गटनेते करणार पाहणी


मुंबई । प्रतिनिधी 7 Nov 2017-
मेट्रो रेल्वेसाठी एमएमआरडीएने आतापर्यंत 4 हजार झाडे तोडली असून आता आणखीन 444 झाडे तोडण्याचा प्रस्ताव महापालिकेकडे सादर केला आहे. मात्र या झाडांच्या कत्तलीला परवानगी देण्याला सत्ताधारी शिवसेनेचा विरोध आहे. दरम्यान या झाडांची महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सर्व पक्षीय गटनेते, वैधानिक समितीचे अध्यक्ष पाहणी करणार असल्याची माहिती सभागृह नेते यशवंत जाधव यांनी दिली.

मुंबईचा सन 2014 - 34 असा 20 वर्षांचा विकास प्रारूप आराखडा तयार करण्यात आला, मात्र त्यामध्ये मेट्रो रेल्वेसाठी आरे कॉलनीत कारशेड बनविण्यास आणि झाडांची कत्तल करण्यास मंजुरी देण्यात आलेली नव्हती. तसेच या कारशेडबाबतचा प्रस्तावही पालिका सुधार समितीने फेटाळला होता. त्यावेळी शिवसेनेनेच या प्रस्तावास विरोध केला होता. आताही शिवसेनेचा या प्रस्तावास आणि झाडांची कत्तल करण्यास विरोध आहे. यामुळे महापौरांनी आरे कॉलनी भेटीबाबत आयुक्त अजोय मेहता यांना रीतसर पत्र पाठवले असल्याची माहिती यशवंत जाधव यांनी दिली. आरे कॉलनीतील सारिपुत नगर येथील 307 व अन्यत्रची 137 अशी 444 झाडे तोडण्याचा प्रस्ताव असून झाडे तोडण्यास शिवसेनेचा विरोध आहे. अनेक पर्यावरणवादी संस्थांचाही झाडे तोडण्याला विरोध आहे. या संस्थानी ही आंदोलने अधिक तीव्र करण्याची गरज असल्याचे यशवंत जाधव यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS