चेंबूर महिला मृत्यूची जबाबदारी पालिकेने झटकली - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

चेंबूर महिला मृत्यूची जबाबदारी पालिकेने झटकली

Share This

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे महिलेचा मृत्यू 
मुंबई । प्रतिनिधी 13 Nov 2017-
चेंबूर मधील स्वस्तिक पार्क येथे जुलै महिन्यात झाड पडून एका महिलेला आपले प्राण गमवावे लागले होते. मात्र या दुर्घटनेचा अहवाल तयार करताना पालिका चोकशी अधिकाऱ्यांनी आपली असवेंदनशीलता दाखवली असल्याचे उघड झाले आहे. सदर अहवालात झाड पडण्यास सोसाट्याचा वारा कारणीभूत असल्याचे सांगत पालिका प्रशासनाने आपले हात झटकले आहेत. या संदर्भात सभागृह नेता यशवंत जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून त्या दुर्देवी महिलेला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असे स्पष्ट करीत आपण याबाबत पालिका सभागृहात आवाज उठविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चेंबूर स्वस्तिक पार्क येथील चंद्रोदय सोसायटी येथील नारळाचे झाड अंगावर पडल्याने एका योग शिक्षिकेचा मृत्यू झाला होता. त्यावेळी पालिकेकडे या धोकादायक झाडाची तक्रार करूनही याकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याने महिलेचा मृत्यू झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये पालिकेविरोधात संतापाची लाट उसळली होती. दरम्यान या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नगरसेविका आशा मराठे यांनी केली होती. सदर महिलेच्या मृत्यू नंतर हे प्रकरण पालिकेवर शेकू नये म्हणून त्यावेळी ते झाड मजबूत असल्याचा अहवाल दिला होता. मात्र आता दिलेल्या अहवालात सदर झाड सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पडल्याचे सांगत पालिका अधिकारी आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसते.

दरम्यान सभागृह नेते यशवंत जाधव यांनी या अहवालही आपण सहमत नसून त्या वेळी चंद्रोदय सोसायटीकडून करण्यात आलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसून आले होते. प्रत्येक वार्डमध्ये उद्यान खात्याचे जे अधिकारी असतात त्यांनी झाडांची पाहणी करणे आवश्यक असते. यांच्या परवानगीशिवाय वृक्ष छाटणी करता येत नसल्याने पालिका प्रशासनाला आपली जबाबदारी झटकता येणार नाही असे यशवंत जाधव यांनी सांगितले. त्यामुळे जबाबदारी स्वीकारून सदर दुर्दैवी महिलेच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देणे पालिकेला बंधनकारक असल्याचेही जाधव यांनी स्पष्ट केले .

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages