टपाल विभाग झाला हायटेक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

टपाल विभाग झाला हायटेक

Share This

पोस्टमनच्या हातात पोस्टमन ऍप
मुंबई । प्रतिनिधी 13 Nov 2017 -
खासगी कुरियर कंपन्यांना टक्कर देण्यासाठी टपाल विभाग आपला माहिती तंत्रज्ञान विभाग आधुनिक करण्याची मोहीम राबवत आहे. त्या दृष्टीने टपाल खात्याने घरोघरी पत्र पोहचविणाऱ्या पोस्टमनला हायटेक बनविले आहे. टपाल खात्याने विकसित केलेले पोस्टमन ऍप आता पोस्टमनच्या हाती आल्यामुळे विविध मालाचे वितरण अचूक वेळेत होण्यास मदत होणार आहे. राज्यात सद्या सुमारे ८७४ पोस्टमन या ऍपचा वापर करीत आहे.

टपाल खात्याकडून पाठविण्यात येणाऱ्या विविध मालाचे वितरण अचूक वेळेत होण्यासाठी पोस्टमन ऍप सुरू करण्यात आले. म्हैसूर येथील सेंटर आॅफ एक्सलन्स इन पोस्टल टेक्नॉलॉजी या संस्थेने हे ऍप विकसित केले आहे. दोन वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील छिंदवाडा आणि महाराष्ट्रात भांडूप येथे प्रायोगिक तत्वावर हे ऍप कार्यान्वित करण्यासाठीआवश्यक असलेल्या सॉफ्टवेअरची चाचणी घेण्यात आली. गेल्या एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात मोबाईलचे वितरण करण्यात आले. त्यानंतर जूनमध्ये पोस्टमनाला हे ऍप कसे चालवायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले. जून महिन्यापासून पोस्टमने हे ऍप प्रत्यक्ष वापरण्यास सुरुवात केली आहे. ऍपचे काम अलिकडेच सुरू झाले असले तरी नजिकच्या काळात स्पीडपोस्ट, पार्सल, रजिस्टर, मनी आॅर्डर या सेवांमध्ये २० ते २५ टक्क्यांनी वाढ होईल असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळी कार्यालयात आल्यावर दिवसभर वाटाव्या लागणाऱ्या टपालाची यादी करावी लागते. त्या यादीची प्रिंटेड कॉपी घेऊन पोस्टमन हे टपाल वाटायला निघतात. त्यानंतर टपाल वाटल्याची किंवा वापस आल्याची नोंद करावी लागायची आणि त्यात पोस्टमनचा बराच वेळ जायचा.पण आता या अ‍ॅपमुळे स्पीडपोस्ट, मनीऑर्डर, पार्सल, बल्क डिलीव्हरी, रजिस्टर पोस्ट हे पार्सल आता कुठल्या स्थितीत, कुठल्या ठिकाणी आहे, हे ग्राहकाला सहजरित्या समजणार आहे. वस्तू लवकर आणि व्यवस्थित पोहोचल्याची पोचपावती या ऍपमुळे मिळण्यास मदत होणार आहे. जीपीएस तंत्रज्ञानामळे मालाचे वितरण झाल्याची वास्तव वेळ यामुळे समजण्यास मदत होणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages