महापालिका पोटनिवडणुकीत भाजपाच्या प्रतिभा गिरकर विजयी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापालिका पोटनिवडणुकीत भाजपाच्या प्रतिभा गिरकर विजयी

Share This

मुंबई | प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २१ मधील पोटनिवडणुकीत प्रतिभा योगेश गिरकर विजयी झाल्या आहेत. त्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या उमेदवार निलम मधाळे यांचा ७६०७ मतांनी पराभव केला.

भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि माजी उपमहापौर शैलजा गिरकर यांच्या निधनामुळे पश्चिम उपनगरांतील कांदिवलीच्या डहाणूकरवाडीतील वॉर्ड क्रमांक २१ मध्ये पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. भाजपकडून शैलजा गिरकर यांच्या सून प्रतिभा योगेश गिरकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. शिवसेनेनेही भाई गिरकर यांच्याशी असलेल्या चांगल्या संबंधांमुळे गिरकर यांना पाठिंबा दिला होता. प्रतिभा गिरकर यांच्या विरोधात काँग्रेसच्यावतीने निलम मधाळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. बुधवारी १३ डिसेंबरला या पोटनिवडणुकीसाठी २८.७५ टक्के मतदान झाले. यावेळी ११ हजार ८०४ मतदारांनी आपला हक्क बजावला. यात पुरुष मतदारांची संख्या ६ हजार ६३१ आणि महिला मतदारांची संख्या ५ हजार १७३ इतकी होती. आज गुरुवारी या पोटनिवडणुकीची मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत भाजपाच्या प्रतिभा गिरकर यांना ९५९१ मते मिळाली. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या उमेदवार निलम मधाळे यांना १९८४ मते मिळाली. तर २२९ जणांनी नोटाचा वापर केला. प्रतिभा गिरकर यांच्या विजयामुळे भाजपाचे पालिकेतील संख्याबळ आता ८३ झाले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages