मुंबई महापालिका परळ येथे कलादालन उभारणार ! - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई महापालिका परळ येथे कलादालन उभारणार !

Share This

मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेने आपत्कालीन व्यवस्थापनाबाबत परळ येथे कलादालन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या कलादालनात भूकंप, त्सुनामी, चक्रीवादळ, आग, दरड कोसळणे, वातावरणातील बदल, रासायनिक, जैविक, किरणोत्सर्ग, आण्विक इत्यादी आपत्कालीन परिस्थितीची माहिती देणारी चलतकृती आणि प्रतिकृती २ डी व ३ डी स्वरूपातील चित्रे व भित्तिचित्रे साकारण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिका ६ कोटी ८४ लाख रुपये खर्च करणार आहे.
मुंबईमधील मध्यवर्ती एफ/दक्षिण विभागातील परळ येथील कल्पतरू मूलस्थान सुविधा केंद्रात असलेल्या तळमजल्यावरील पोटमाळ्यावर हे कलादालन बांधण्याचे प्रस्तावले आहे. सदर कलादालनाचे चटई क्षेत्रफळ अंदाजे १५० चौरस मीटर आहे. सदर कलादालनात भूकंप, त्सुनामी, चक्रीवादळ, आग, दरड कोसळणे,वातावरणातील बदल ,रासायनिक ,जैविक, किरणोत्सर्ग,आण्विक इत्यादींची आपत्कालीन परिस्थितीची माहिती देणारी प्रतिकृती तयार करणे व सदर परिस्थितीशी सामना करण्यासाठी घ्यावयाच्या दक्षतेविषयी २ डी व ३ डी स्वरूपात तसेच एलईडी स्वरूपातील चलतचित्रे व भित्तिचित्रांच्या माध्यमातून माहिती देण्यात येणार आहे. तसेच कलादालनाच्या बाहेर माहिती फलक बसवणे, प्रत्येक दिवशी होणाऱ्या कार्यक्रमाचा माहिती फलक बसवणे, प्रत्येक मजल्यावर आपत्कालीन व्यवस्थापनविषयी माहिती फलक बसवणे, मुख्यद्वारावर कलात्मक संकल्पचित्रे रंगवणे आदी कामे करण्यात येणार आहेत. यासाठी मे. ब्यूकॉन इंजिनियर्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. या कंपनीला सुमारे ६ कोटी ८४ लाख ९१ हजार रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. यासंदर्भातील प्रस्ताव पालिका प्रशासनाने स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी सादर केला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages