पालिकेच्या १३८८ पदांसाठी ११ डिसेंबरपासून ऑनलाइन अर्ज - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेच्या १३८८ पदांसाठी ११ डिसेंबरपासून ऑनलाइन अर्ज

Share This

मुंबई | प्रतिनिधी - मुंबई महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कामगारांच्या १३८८ जागा भरण्यासाठी सोमवारी ११ डिसेंबरपासून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार असून ३१ डिसेंबरपर्यंत हे अर्ज स्वीकारले जाणार आहे.

पालिकामध्ये सन २००९ नंतर इतकी मोठी भरती होत आहे. स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगांवकर यांनी मान्यता दिल्यानंतर भरतीची प्रतीक्षा संपली आहे. जलविभाग, आरोग्य खाते, रुग्णालये, मलनि:सारण, कक्षपरिचर, हमाल, आया, स्मशान कामगार आदी अत्यावश्यक विभागांमध्ये कामगारांची पदे रिक्त असून या सर्व विभागांत आदी वर्गांतील १३८८ रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. एकूण १३८८ पदांपैकी खुला प्रवर्गासाठी ५൦४, अनुसूचित जातीसाठी २२३, अनुसूचित जमातीसाठी १०८, विमुक्त जातीसाठी ४८भटक्या जमाती ब साठी ३४, भटक्या जमाती क साठी ५१, भटक्या जमाती ड साठी ३२, विशेष मागासवर्गसाठी ३२ तर इतर मागासवर्ग (ओबीसी) साठी ३५६ जागा राखीव असणार आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवार मराठी विषयासह किमान दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. पुरूष उमेदवाराचे किमान वजन ५० किलो ग्रॅम, तर किमान उंची १७५ सेंटीमीटर तसेच महिला उमेदवाराचे किमान वजन ४५ किलो ग्रॅम तर किमान उंची - १५० सेंटीमीटर असावी अशी अट आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज http://portal.mcgm.gov.in या किंवा mcgmlabourrecruitment.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत.

ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक -
ऑनलाईन अर्ज सुरु : सोमवार ११ डिसेंबर २०१७
ऑनलाईन अर्जांची शेवटची तारीख : रविवार ३१ डिसेंबर २०१७ (२३.५९ वाजेपर्यंत)
'स्टेट बँक ऑफ इंडिया'च्या शाखेत शुल्क स्वीकारण्याचा कालावधी : ११ डिसेंबर २०१७ ते १ जानेवारी २०१८
ऑनलाईन परिक्षेसाठी प्रवेशपत्र मिळण्याची तारीख :१५ जानेवारी २०१८
ऑनलाईन परीक्षा : फेब्रुवारी महिन्याचा दुसरा व तिसरा आठवडा
उमेदवारांना परीक्षेत मिळालेल्या गुणांबाबतची माहिती : फेब्रुवारी महिन्याचा चौथा आठवडा
अंतिम निवड यादी : एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages