Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी गळतीचे प्रमाण ८ टक्के


विद्यार्थी कमी तरी खर्चात वाढ -
मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी गळतीचे प्रमाण ८ टक्के असल्याचा तर एमपीएस शाळांमधील गळतीचे प्रमाण २ टक्के इतके कमी असल्याचे प्रजा फाउंडेशने प्रसिद्ध केलेल्या श्वेतपत्रिकेत म्हटले आहे. मुंबई प्रेस क्लब येथे महानगरपालिकेच्या शाळांसंदर्भात काढलेल्या श्वेतपत्रिकेमध्ये असा दावा करण्यात आला आहे. प्रजा फाउंडेशन या संघटनेकडून माहिती अधिकारातून मिळवलेल्या आकडेवारीवरून दरवर्षी महापालिका व राज्य सरकारच्या तसेच आमदारांच्या कामगिरीबाबत श्वेतपत्रिका काढली जाते. या वर्षीची श्वेतपपत्रिका मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली.

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीसाठी २००८-९ मध्ये पहिलीच्या वर्गात ६३ हजार ३९२ विद्यार्थी होते २०१६ -१७ मध्ये घट होऊन त्यांची संख्या ३२ हजर २०१८ वर आली आहे. पहिलीच्या वर्गात ४९ टक्के एतकी घट आढळून आली आहे. “पालिका शाळेतील पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या गळतीचा दर सध्यासारखा राहिल्यास २००८-९ दरम्यान ६३ हजार ३९२ विद्यार्थ्यांच्या तुलनेत २०२०-२१ मध्ये केवळ १६ हजार २७५ विद्यार्थी शिकत असतील.” प्रजा फाउंडेशनचे प्रकल्प संचालक मिलिंद म्हस्के यांनी सांगितले. “बृहन्मुंबई महानगर पालिकेला २०१६ -१७ दरम्यान प्रती विद्यार्थी ४४ हजार ३९४ रुपये खर्च आला. २०१७-१८ दरम्यान प्रती विद्यार्थी ५२ हजार १४२ रुपये इतकी तरतूद करण्यात आली होती. त्याशिवाय पालिकेच्या शाळा आरटीई आणि शाळा सिद्धी शिक्षक मुल्यांकन निकषांचे पालन करतात. त्यात ५६ टक्के शाळांमध्ये शिकवण्याचा दर्जा मध्यम स्वरूपाचा असल्याचे स्पष्ट होते. तरी या घटकांसोबत घेतलेल्या श्रमानंतरही पालिका शाळांतील विद्यार्थी स्थिती खालावलेलीच आढळते.” असे म्हस्के म्हणाले. शैक्षणिक टप्प्याच्या मध्यावर (पाचवी) होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत असाच असमानतेचा कल दिसला. पालिका शाळेतील एकूण शिष्यवृत्तीला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी निव्वळ १.६ टक्के मुलांना शिष्यवृत्ती मिळाली तर खासगी शाळेतील ११.८ टक्के विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळविण्यात यशस्वी ठरली. सन २०१६ - १७ मध्ये पालिका शाळेतील विद्यार्थ्यांचे एसएससी उत्तीर्ण टक्केवारीची ६९ टक्के होती तर खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांची टक्केवारी ९२ टक्के इतकी होती असे अहवालात म्हटले आहे.

४८ टक्के लोक असमाधानी -
४८ टक्के लोक पालिका शाळेत मिळणाऱ्या वाईट सुविधांमुळे असमाधानी आहेत. बृहन्मुंबई पालिका शाळांमधील शिक्षणाचा दर्जा खालावलेला असल्याचे ४६ टक्के लोकांना वाटते. तर पालिका शाळेत शिक्षण घेतल्यास अभ्यासात सुधारणा होणार नाही तसेच भविष्यात रोजगाराच्या संधी मिळणार नाहीत असे ४१ टक्के लोकांना वाटते.
- अंजन घोष, वरिष्ठ उपाध्यक्ष, हंसा संशोधन संस्था

व्यवस्थापन शिक्षण कक्षा विस्तारण्याची आवश्यकता - 
मागील काही वर्षांपासून शिक्षकांची कामगिरी आणि विद्यार्थ्यांचे निकाल एकमेकांना जोडण्यात प्रजा मार्गदर्शन पुरवते आहे. अर्थात हे पाऊल उचलताना पालिकेने शिक्षक आणि मुख्याध्यापकांना आवश्यक ते प्रशिक्षण पुरविण्यात येते का? शाळा व विद्यार्थी यांच्या संदर्भात प्रशासन आणि क्षमता निर्मिती यंत्रणेचा ताळमेळ आहे का? याविषयी पडताळणी केली पाहिजे. याशिवाय शाळा व्यवस्थापन समितीला सर्वसमावेशक व्यवस्थापन शिक्षण कक्षा विस्तारण्याची आवश्यकता आहे.
- निताई मेहता, संस्थापक आणि व्यवस्थापकीय विश्वस्त, प्रजा

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom