पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना कुस्ती, कराटे सरावासाठी मॅट भेटणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 December 2017

पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना कुस्ती, कराटे सरावासाठी मॅट भेटणार


पालिका ५९ लाख खर्च करणार -
मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेच्याशनमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कुस्ती आणि ज्युडो कराटेच्या सरावासाठी मॅटच्या खरेदीकरिता ५९ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. तसा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून शारीरिक शिक्षणाचा कार्यक्रम म्हणून गेल्या ३० वर्षांपासून कुस्ती आणि ज्युडो कराटे स्पर्धांचे आयोजन करण्यात आले जाते. त्याला विद्यार्थी शिक्षक आणि पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पालिकेच्या शिक्षण विभागाचे शारीरिक शिक्षण उपविभागाचे १७ विभाग आहेत. त्यासाठी प्रत्येक विभागास मध्यवर्ती ठिकाणी कुस्ती आणि ज्युडो कराटे मॅटची आवश्यकता असल्याने अश्या मॅट उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी पालिकेने निविदा मागविल्या होत्या. त्याला अमी इंटरप्रायझेस, संदीप टेक्सटाईल इंडस्ट्रीज व लाद्रीया टेक्सटाईल्स प्रोजेक्स्टस प्रायव्हेट लिमिटेड या तीन निविदाकारांनी प्रतिसाद दिला आहे. त्यापैकी संदीप टेक्सटाईल्स यांनी योग्य किंमतीची हमी दिल्याने व त्यांनी सर्वात कमी बोली लावल्याने त्यांचाकडून या मॅट खरेदी केल्या जाणार आहेत. ज्युडो मॅटच्या ३२ मॅटच्या एका संचाला १ लाख ७४ हजार ८८८ रुपये प्रमाणे १७ संचासाठी २९ लाख ७३ हजार ९६ रुपये तर कुस्ती मॅट कव्हरसह ३२ मॅटच्या १ संचाला १ लाख ७४ हजार ८८८ रुपये प्रमाणे १७ संचासाठी २९ लाख ७३ हजार ९६ रुपये असे एकूण ५९ लाख ४६ हजार १९२ रुपये खर्च केले जाणार आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS