Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

पालिका सभागृहात मोबाईल वापरणाऱ्या नगरसेवकांना तंबी


मुंबई | प्रतिनिधी -
स्मार्ट फोन मोबाईलचा वापर गेल्या काही वर्षांत वाढला असल्याने मोबाईलच्या आहारी तरुण पिढी गेल्याची टिका सातत्याने केली जाते. याला आता मुंबईचे नगरसेवकही अपवाद राहिलेले नाहीत. मुंबई महापालिकेच्या ऐतिहासिक पालिका सभागृहात महत्वपूर्ण विषयांवर कामकाज चालू असताना अनेक नगरसेवक मोबाईल वापरातच गर्क असल्याचे पाहून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी, "नगरसेवकांनी, सभागृहात मोबाईलचा सतत वापर करणे बंद करावे, सभागृहात शिस्त पाळावी,"अशा शब्दांत सर्वपक्षीय नगरसेवकांना तंबी दिली आहे.

मुंबई महापालिकेच्या सभागृहाला ऐतिहासिक असे महत्व आहे. पालिकेच्या ऐतिहासिक अश्या सभाहागृहात नगरसेवकपदाची कारकीर्द गाजवून मनोहर जोशी हे मुख्यमंत्री, लोकसभेचे सभापती झाले. छगन भुजबळ हे महापौर, उप मुख्यमंत्री, मंत्री झाले. त्याच ऐतिहासिक महापालिकेच्या सभागृहाचे कामकाज चालू असताना नगरसेवक मात्र मोबाईल वापरात व्यस्त असल्याचे निदर्शनास आल्याने महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी अनेक वेळा सूचना दिल्या आहेत. मात्र या सूचनाकडे नगरसेवक दुर्लक्ष करत असल्याने गुरुवारी ,"सभागृहात मोबाईलचा वापर बोलणे, शूटिंग करणे, फ़ोटो काढणे, मोबाईल बघत बघणे आदींसाठी करू नका", अशी तंबी सर्वपक्षीय नगरसेवकांना दिली. यावेळी काही नगरसेवकांनी मोबाईल जप्त करा अशी मागणी केली. या मागणीकडे महापौरांनी दुर्लक्ष केल्याने त्यानंतरही अनेक नगरसेवक मोबाईलमध्ये गर्क असल्याचे दिसून आले. याच सभागृहात महापौर महादेव देवळे यांनी पालिका सभागृहात कामकाज चालू असताना मोबाईलचा वापर करणारे काँग्रेसचे दिवंगत नगरसेवक विनोद शेखर यांचा मोबाईल जप्त केला होता. यामुळे पुढील सभेत नगरसेवक सभागृहाचा मान ठेवतात का ? सभागृहात मोबाईल न वापरता शिस्त पाळतात का ? सभागृहात मोबाईल वापरणाऱ्या नगरसेवकांचे मोबाईल महापौर जप्त करतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom