पालिकेच्या एस वॉर्डमधील लाचखोर अभियंत्याला पकडले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेच्या एस वॉर्डमधील लाचखोर अभियंत्याला पकडले

Share This
मुंबई । प्रतिनिधी - 
मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड कार्यालयांमध्ये सर्वात भ्रष्ट म्हणून भांडुप एस वॉर्डचे नाव घेतले जाते. या वॉर्डमधील अधिकाऱ्यांना अनेक वेळा लाच घेताना पकडण्यात आलेले आहे. अश्या या भ्रष्ट वार्ड मधील ज्युनिअर अभियंता राहुल जगन्नाथ लोखंडे यांना गुरुवारी एका हॉटेल व्यावसायिकाकडून 35 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली आहे. 

तक्रारदार हॉटेल व्यावसायिक असून त्यांच्या मालकीचा भांडुप परिसरात एक हॉटेल आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी महानगरपालिकेची कुठलीही परवानगी न घेता हॉटेलची दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. ही माहिती मिळताच राहुल लोखंडे व त्यांच्या पथकाने संबंधित बांधकाम तोडून टाकले होते. या घटनेनंतर तक्रारदार हे राहुल लोखंडे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या भांडुप येथील महानगरपालिकेच्या एस वार्डमध्ये गेले होते. यावेळी हॉटेलमध्ये पुन्हा दुरुस्तीचे काम सुरु करण्यासाठी त्यांनी अर्ज करुन त्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली होती. त्याला परवानगी देण्यासाठी राहुल लोखंडे यांनी त्यांच्याकडे 40 हजार रुपयांची मागणी केली. त्यांनी 35 हजार रुपयांची लाच देण्याची तयारी दाखवून त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर गुरुवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी सापळा लावला होता. तक्रारदाराकडून 35 हजार रुपयांची लाचेची रक्कम घेताना ज्युनिअर अभियंता राहुल लोखंडे यांना या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages