महापौर शिक्षक पुरस्कारांत महिलांची बाजी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापौर शिक्षक पुरस्कारांत महिलांची बाजी

Share This

मुंबई । प्रतिनिधी - महापालिकेच्या ‘महापौर शिक्षक’ पुरस्कारांमध्ये यंदाही महिला शिक्षिका आघाडीवर आहेत. एकूण ५० पुरस्कारांपैकी तब्बल ३९ पुरस्कार महिलां शिक्षिकांना जाहीर झाले आहेत. मागील वर्षी ३३ महिला शिक्षिकांचा पुरस्काराच्या यादीत समावेश होता. यावर्षी यासंख्येत वाढ झाली आहे. यावर्षी केंद्रीय बोर्डाच्या सीबीएसई आणि इंटरनॅशनल बोर्डाच्या आयसीएसई शाळांमधील शिक्षकांचाही या पुरस्कारांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

मुंबई महानगरपालिकेकडून दरवर्षी देण्यात येणार्‍या ‘महापौर शिक्षक’ पुरस्कारांची घोषणा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली. यावेळी उपमहापौर हेमांगी वरळीकर, शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर आदी उपस्थित होते. शिक्षकांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल देण्यात येणार्‍या या पुरस्काराचे स्वरूप दहा हजार रुपये, सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र असे आहे. ५० पुरस्कारांसाठी १२७ प्रस्ताव प्राप्त झाले होते. यामध्ये ९३ महिला तर ३४ पुरुषांच्या प्रस्तावांचा समावेश होता. यामध्ये झालेल्या अंतिम निवडीत ३९ महिलांनी तर ११ पुरुषांनी या पुरस्कारवर आपले नाव कोरले. महापौर पुरस्कार मिळवणाऱ्यांमध्ये १० मराठी माध्यमाचे, १० सीबीएसई आणि आयसीएसई शाळांमधील, ५ मान्यता प्राप्त खासगी अनुदानित, ५ मान्यता प्राप्त खासगी विना अनुदानित, ४ हिंदी, ४ उर्दू, मनपा माध्यमिक व मनपा इंग्रजीचे प्रत्येकी २, तर गुजराथी, तामिळ, कन्नड, शारीरिक शिक्षण, चित्रकला, हस्तकला, संगीत, विशेष मुलांची शाळा या विभागातून प्रत्येकी एकाचा समावेश आहे. यावर्षी पहिल्यांदाच सीबीएसई, आयसीएसई शाळांमधील शिक्षकांनाही या पुरस्कारांमध्ये समाविष्ट करण्यात आल्यामुळे प्रक्रिया लांबली. त्यामुळे या पुरस्कार वितरण सोहळ्यास विलंब झाला असे शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर यांनी सांगितले. या पुरस्कारांचे वितरण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages