बेकायदेशीर हुक्का पार्लर बंद करा - महापौर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेकायदेशीर हुक्का पार्लर बंद करा - महापौर

Share This

मुंबई । प्रतिनिधी - मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या हुक्का पार्लर सुरु असून यामुळे तरुण पिढी बरबाद होत आहे. हुक्का पार्लरमुळे सामाजिक सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असल्याने हुक्का पार्लर बंद करण्यासाठी महानगरपालिका आणि पोलिसांच्या समन्वयाने कारवाई करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पोलीस आयुक्त म्हणून सहकार्य करावे अशी मागणी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून केली.

मुंबईत मोठ्या प्रमाणात हुक्का पार्लर सुरु असून या हुक्का पार्लरमध्ये तरुण पिढी मादक पदार्थांचे सेवन करीत आहे. या हुक्का पार्लरमध्ये गुन्हेगारी क्षेत्रातील समाजकंटकांच्या सर्रास वावर असतो. दुर्दैवाने आजची तरुण पिढी याकडे आकर्षित होत असल्याने समाज स्वास्थाच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. मादक पदार्थांचे सेवन केल्याने स्वतःवरील नियंत्रण घालवून बसलेल्या आजच्या तरुणाईकडून मारामाऱ्या - खून असे प्रकार घडत आहेत . मुंबईत अनेक हुक्का पार्लर शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात असल्याने विद्यार्थी दशेतील युवक ह्या हुक्का पार्लरमध्ये जात असल्याने बरबाद होत आहेत. ह्या सर्व बाबींचा विचार करता सामाजिक सुरक्षिततेसाठी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस यंत्रणा दोन्ही एकत्र येऊन हुक्का पार्लर वर प्रतिबंध घालणे आवश्यक असल्याचे महापौरांनी म्हटले आहे .

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages