राजू पेडणेकर यांच्या नगरसेवक पदावर शिक्कामोर्तब - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राजू पेडणेकर यांच्या नगरसेवक पदावर शिक्कामोर्तब

Share This
File Photo 
मुंंबई । प्रतिनिधी - अंधेरी पश्चिम प्रभाग क्र. ६२ मधील अपक्ष उमेदवार चंगेझ मुलतानी यांचे जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर लघुवाद न्यायालयाने दुसऱ्या क्रमाकांचे उमेदवार राजू पेडणेकर यांच्याबाजूने निकाल दिल्याने गुरुवारी पालिका सभागृहात महापौर विश्वनाथ म्हाडेश्वर यांनी पेडणेकर यांची नगरसेवक पदी नियुक्ती केल्याची घोषणा केली. या नियुक्तीमुळे शिवसेनेची सभागृहातील अधिकृत संख्याबळ ८५ होणार आहे. फेब्रुवारी २०१७ च्या पालिका निवडणुकीत चंगेझ मुलतानी हे निवडून आले होते. मात्र ओबीसी राखीव कोट्यातून जिंकून आलेल्या मुलतानी यांनी बोगस जात प्रमाणपत्र दिल्याची तक्रार राजू पेडणेकर यांनी केली होती. त्यानुसार जात वैधता समितीने जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यामुळे मुलतानी यांचे महापालिका सदस्यत्व रद्द झाले. यावर लघुवाद न्यायालयानेही दिलेल्या सुनावणीत मुलतानी यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याचे सांगत दुसर्‍या क्रमांकाचे उमेदवार शिवसेनेचे राजू पेडणेकर यांच्या नावावर नगरसेवक म्हणणू शिक्कामोर्तब केले होते. दरम्यान, आज महासभेत पेडणेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages