Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

"स्वच्छ सर्वेक्षण २०१८" येत्या आठवडयात सुरु होणार


६२ हजार मुंबईकरानी केला ‘स्वच्छता ऍप’ डाऊनलोड -
मुंबई । प्रतिनिधी - स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१८ हे जानेवरीच्या पहिल्या आठवडयात सुरु होत असून, या सर्वेक्षणात अधिका-अधिक नागरीकांनी स्वच्छता ऍप डाऊनलोड केल्यास स्वच्छ भारत अभियानात मुंबईचे स्थान अग्रभागी रहावे यासाठी लाखो मुंबईकरांनी ‘स्वच्छता ऍप’ डाऊनलोड करावे असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. स्वच्छ भारत अभियांनातर्गत ‘स्वच्छता ऍप’ डाऊनलोड करावे असे आवाहन बृहन्मंबई महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. या आवाहनाला मुंबईकराने मोठा प्रतिसाद दिला असून सुमारे ६२ हजार मुंबईकरांनी हा ‘स्वच्छता ऍप’ आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड केला आहे.

गुगल प्ले स्टोअर व अँपल ऍप स्टोअरवरुन “Swachhata-MoHUA App” डाऊनलोड करुन हे ऍप डाऊनलोड झाल्यानंतर नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता आढळल्यास तेथील फोटो काढून ऍपद्वारे पाठविल्यास मुंबई महापालिकेकडून त्वरीत १२ तासाच्या आत स्वच्छतेबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे. आतापर्यंत महापालिका प्रशासनाकडे या ऍप व्दारे ४६ हजार तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी प्रशासने ४४ हजार ५०० तक्रारीचे निराकरण केले आहे. ‘स्वच्छता ऍप’ डाऊनलोड करावे असे आवाहन करण्यासाठी महापालिकेने नागरिकांमध्ये मोठय़ा प्रमाणात प्रबोधन करण्यासाठी विविध प्रसारमाध्यमांचा वापर केलेला आहे. या मध्ये दुरचित्रवाहिनीव्दारे सुप्रसिद्ध कलाकार श्रुती मराठे व गौरव घाटणेकर यांनी ‘स्वच्छता ऍप’ नागरिकांनी डाऊनलोड करण्याच्या बाबतीत आवाहन केले आहे. तसेच रेल्वे-स्टेशन, बस थांबा विविध मॉल या ठिकाणी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी पथनाटय़ाद्वारे स्वच्छतेबाबत मुंबईकर नागरिकांमध्ये प्रबोधन करीत आहेत. तसेच या प्रबोधन कामासाठी श्री आस्था महिलाबचत गटाव्दारे शहरातील विविध पर्यटन व गर्दीच्या ठिकाणी मोठयाप्रमाणात स्वच्छता रथ व पथनाटयव्दारे स्वच्छतेबाबत प्रबोधन केले जात आहे. त्याचबरोबर शहरातील महाविदयालय, शाळा आदी ठिकाणी ‘स्वच्छता ऍप’ बाबत माहिती दिली जात आहे, महापालिकेच्या सर्व विभाग/खाते यांच्या मध्ये ‘स्वच्छता ऍप’ विषय माहिती देण्यासाठी अधिकारी वर्गाचा एकसंच नियुक्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर झोपडपटी परीसरामध्ये स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान मध्ये वस्ती पातळीवरील कार्यरत असलेल्या ७७१ स्थानिक सामाजिक संस्था याविषयी जनजागृती करीत आहे.

जिल्हाधिकारी व बेस्ट व्यवस्थापकही सहभागी - 
महापालिकेच्या अधिका-यांकडून बेस्ट आस्थापनेवरील सर्व अधिकारी कर्मचारी यांना स्वच्छता ऍप ची माहिती देऊन ‘स्वच्छता ऍप’ डाऊनलोड करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे तसेच मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी संपदा मेहता यांनी आपल्या मोबाईलमध्ये ‘स्वच्छता ऍप’ डाऊनलोड केले. सदर अधिकारींनी आपल्या सर्व कर्मचारी व अधिका-यांना स्वच्छ भारत अभियानासाठी ‘स्वच्छता ऍप’ डाऊनलोड करुन स्वच्छाग्रही बनण्यासाठी आवाहन केले. बेस्टच्या वडाळा, दादर, प्रतिक्षानगर, धारावी, गोरेगांव ,जिल्हाधिकारी शहर कार्यालय तसेच भांडुप विभागातील कंपनी आस्थापनातील कर्मचारी अधिकारी वर्गाने स्वच्छता ऍप डाऊनलोड केले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom