राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ जाहीर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ जाहीर

Share This

मुंबई - तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया व तायक्वांदो असोसिएशन ऑफ छत्तीसगढ़ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 37 व्या राष्ट्रीय ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेसाठी व 10 व्या राष्ट्रीय पुमसे तायक्वांदो स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ जाहीर करण्यात आले. या स्पर्धा 28 ते 31 डिसेंबर दरम्यान छत्तीसगड येथे होणार आहेत.

पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्याची निवड या राष्ट्रीय स्पर्धेसाठी करण्यात आली असून 6 ते 7 वर्षानंतर तायक्वांदोमधील वाद विवाद बाजूला ठेवत खेळासाठी सर्वजण एकत्र येऊन संघ निवड करण्यात आली आहे. त्यामुळे या राष्ट्रीय स्पर्धेत खेळाडू कशी कामगिरी करतात, याबाबत कुतूहल निर्माण झाले आहे. या खेळाडूंकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या सर्व खेळाडुंना राष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक सुरेश चौधरी (सांगली), तुषार आवटी (पुणे ), प्रसाद कुलकर्णी (औरंगाबाद), पद्माकर कांबळे (कोल्हापूर) राजा मखवाना (पालघर), रोहित जाधव (ठाणे), प्रशांत गजभिये (नाशिक) या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

महाराष्ट्राचे संघ :-
मुले - रिशी भालेकर (मुंबई), कौस्तुभ कसबे (पुणे), चंद्रकांत लोहार (सांगली), अनिकेत कुचिकोरवी (सांगली), निखील सातपुते (सांगली), चंचल शर्मा (मुंबई उपनगर), सुजोग जगताप (ठाणे), रितेश अगवाने (मुंबई उपनगर), साहील घुगे (ठाणे), सौरभ जाधव (कोल्हापूर)

मुली - रोहीणी फड (अकोला), अंजली तायडे (अकोला), मनिषा जाधव (सांगली), पुनम खाशिद (अकोला), जान्हवी फिरमे ( सातारा), मधु सिंग (मुंबई), पुजा कांबळे (सांगली), शिवाणी चव्हाण (सांगली), रुपाली काळोखे (सांगली), मेघा खरात (मुंबई उपनगर),

पुमसे तायक्वॉदो संघ - आकाश पानचाळ, सूची सरोज, यश गुरुव, प्राजक्ता बदगिरे, साहील पाटील, शुभम यादव, हार्दिक शेट, प्राजक्ता बदगिरे, निधी तानसे ( सर्व पालघर जिल्हा).

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages