पवईत क्रेन कोसळून ३ कामगारांचा मृत्यू, २ जखमी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पवईत क्रेन कोसळून ३ कामगारांचा मृत्यू, २ जखमी

Share This

मुंबई | प्रतिनिधी - मागील वर्षात इमारत पडण्याच्या, भानु फरसाण आणि कमला मिलमधील आगीच्या घटना ताज्या असतानाच नव्या वर्षाचा पहिल्याच दिवशी पालिकेचे काम सुरु असताना क्रेनचा भाग कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी आहेत. जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पवई येथील आयआयटीच्या मुख्य दरवाजासमोर मुंबई महापालिकेच्या मलनीःसारण वाहिनीचे काम सुरु होते. हे काम खासगी कंत्राटदाराला देण्यात आले होते. हे काम करताना 25 फूट खोल खड्डा खोदण्यात आला होता. या खड्यातील माती काढण्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू होते. सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान खड्ड्यामधील माती काढणायचे काम सुरु होते. काही कामगार खड्ड्यात उतरले होते. हे काम सुरु असताना माती काढणा-या हायड्रो क्रेनचा माती उचलणारा भाग (बकेट) कामगारांच्या अंगावर कोसळला. यात सत्यनारायण सिंग (३२), रामेश्वर समय (४२) आणि विश्वनाथ सिंग (३५) या तीन कामगारांचा मृत्यू झाला. तर पोरत सिंग ४७, रामनाथ सिंग ४८ हे दोन कामगार जखमी झाले आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages