Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

आंबेडकरी चळवळ एक होण्याची सरकारला भीती - अॅड. प्रकाश आंबेडकर


मुंबई - अनेक गटातटात विभागलेली आंबेडकरी चळवळ पुन्हा एक होते आहे, या चळवळीशी डावे व ओबीसी संघटनाही जोडल्या जात आहेत, त्या भीतीतून आंबेडकरी कार्यकर्त्यांची पाेलिसांकडून धरपकड सुरू असून गुन्हे दाखल केले जात आहेत, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला अाहे.

काेरेगाव भीमा येथील विजय स्तंभास वंदन करण्यास फक्त आंबेडकरी कार्यकर्तेच नव्हे तर ओबीसी समाजाचेही लाखो कार्यकर्ते आले होते. आंबेडकरी चळवळ पुन्हा एकत्र येण्याचे संकेत त्या घटनेतून सरकारला मिळाले आहेत. आंबेडकरी चळवळ एकत्र येऊ नये, अशी सरकारची इच्छा आहे. त्यासाठी समाजात भय पसरवले जात आहे, म्हणूनच आंबेडकरी कार्यकर्त्यांची धरपकड केली जात आहे, असा आरोप आंबेडकर यांनी केला आहे. धरपकडीने कार्यकर्त्यांनी घाबरून जाऊ नये, पोलिस गुन्हे दाखल करतील, आपण वकील तयार ठेवले आहेत, ते जामीन मिळवून देतील, सरकार दाखल करत असलेल्या गुन्ह्याचे काय करायचे ते भविष्यात ठरवू, असेही ते म्हणाले.

दगडफेकीमागचे डोके शोधून पुरावे देणार -
कोरेगाव भीमा येथील दगडफेकीमागे कुणाचे डोके आहे. याचा शोध घेऊन पुरावे देऊ असे भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. या प्रकरणानंतर राज्यातील बहुजन समाजात सरकारविषयी सापत्न भावाची भावना निर्माण झाली आहे. सरकारने बहुजन समाजाच्या भावना लक्षात घेऊन याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

कोरेगाव भीमाच्या दंगलीला आज आठवडा उलटला आहे. या दुर्घटनेनंतर महाराष्ट्रात आणि देशात 3 दिवस तणावाचे वातावरण होते. तरीही अजून याप्रकरणी कोणालाही अटक झालेली नाही. पुण्यात संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पण अद्याप सरकारने त्यांना अटक केलेली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. याप्रकरणी सोशल मीडियात अपप्रचार देखील केला जात आहे. सरकार या प्रकरणाकडे गांभीर्याने पहात नसल्याने आम्ही स्वतःच आता कोरेगाव भीमाच्या दंगलीप्रकरणी शोध मोहीम हाती घेणार असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

सरकार अद्यापही गप्प असून त्यामुळे आम्हालाच या प्रकरणाचा शोध घ्यावा लागत आहे. भिडे गुरुजी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सरकारने गुन्हा दाखल झाल्यानंतर तरी त्यांना अटक करणे अपेक्षित होते. मात्र त्यांना अटक का होत नाही याचाही आम्ही शोध घेणार आहोत, असे मत आंबेडकर यांनी व्यक्त केले. सोशल मीडियावर दलित-मराठा संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न होत असल्याचाही मुद्दा त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom