माझ्या तडाख्यातून सुटलो असे समजू नका- राज ठाकरे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

माझ्या तडाख्यातून सुटलो असे समजू नका- राज ठाकरे

Share This

मुंबई - माझ्या व्यंगचित्रांचा बॅकलॉग वाढला आहे. पण मी बॅकलॉग ठेवणा-यातला मी नाही. लवकरच तो बॅकलॉग भरून काढणार आहे. माझ्या तडाख्यातून सुटलो असे कोणाला वाटत असेल तर चूक, व्यंगचित्रातून तडाखे बसणारच अशा इशारा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहे. राज ठाकरे यांनी दिलेला इशारा हा सत्ताधाऱ्यांना असल्याने येत्या काळात राज ठाकरे व्यंगचित्रांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांवर कसे फटकारे मारतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

राज ठाकरे मागील काही महिन्यांपासून सतत राज्यातील-देशातील राजकीय घडामोडीवर सोशल मिडियाद्वारे भाष्य करत होते. मात्र, डिसेंबर महिन्यात त्यांनी आपल्या मुलाचा साखरपुडा झाल्यापासून थोडा ब्रेक घेतला होता. त्याच दरम्यान मुंबईसह राज्यात ब-याच घटना घडल्या. कमला मिल आगीसह कोरेगाव भीमाच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले. मात्र, राज ठाकरे शांत होते. 

राज ठाकरे यांनी फेसबुकवर एक संदेश टाकला आहे. त्यात, काही गोष्टी मी पाहत होतो, समजून घेत होतो. यातील बारकावे लक्षात घेत होतो. त्यामुळे माझा बॅकलॉग वाढलाय हे खरं आहे पण लवकरच हा बॅकलॉग भरून काढणार आहे असे राज यांनी म्हटले आहे. आता अधिक काही बोलत नाही. लवकरच व्यंगचित्रांची मालिका पुन्हा सुरु होईल. तुम्हाला आवडेल नक्की. ज्यांना त्रास व्हायचाय त्यांना होईल. बाकी सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा, असे म्हटले आहे. या संदेशाद्वारे ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages