कोरेगाव भीमा दंगलीत ९.४८ कोटींचे नुकसान - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कोरेगाव भीमा दंगलीत ९.४८ कोटींचे नुकसान

Share This

पुणे - कोरेगाव भीमा येथे एक आणि दोन जानेवारीला झालेल्या दंगलीमध्ये खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे सुमारे नऊ कोटी ४८ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. शिरूरच्या नायब तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून नुकसानीचे पंचनामे तयार करण्यात आले आहेत. या पथकामध्ये महसूल विभागाचे मंडल अधिकारी, ग्रामसेवक आणि पोलिस प्रशासनाच्या प्रतिनिधींचा समावेश होता. या पथकाने १६९ ठिकाणी पंचनामे करून त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे. १६९ ठिकाणी करण्यात आलेल्या पंचनाम्यांमध्ये ८८ चारचाकी गाड्या, ६७ दुचाकी गाड्या, १४ घरे, तीन बसेस, आठ ट्रक, ६३ हॉटेल आणि दुकाने आदींचा समावेश आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages