राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधकांचा बहिष्कार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधकांचा बहिष्कार

Share This
मुंबई  - विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपाल सी.विद्यासागर यांच्या अभिभाषणा दरम्यान राज्य सरकारच्या कारभाराच्या निषेधार्थ विरोधकांनी घोषणाबाजी केली. तसेच हे सरकार घोषणांच्या नावाखाली जनतेला गाजर देत असून सरकारवर निष्क्रीयतेचा आरोप करत विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार घातला. 

विधिमंडळ अधिवेशनाच्या प्रथेप्रमाणे राज्यपालांचे अभिभाषण दोन्ही सभागृहाच्या संयुक्त सभागृहाच्या सदस्यांसमोर होत असते. त्यानुसार राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांसमोर भाषणास सुरुवात केली. त्यावेळी विरोधी कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी सरकारच्या निष्क्रियतेच्याविरोधात घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली. विरोधकांकडून घोषणाबाजी सुरु असतानाही राज्यपालांनी आपले भाषण तसेच सुरु ठेवले. त्यातच विरोधकांनी घोषणाबाजी करत सरकारच्या कारभाराच्या निषेधार्थ बहिष्कार घालत संयुक्त सभागृहातून उठून बाहेर गेले. 

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांसमोर राज्यपालांचे अभिभाषण होत असताना त्याचे मराठीत भाषांतर समांतर पध्दतीने वाचून दाखविण्यात येत होते. मात्र यंदा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी अभिभाषण सुरु करून बराच वेळ लोटला तरी अनुवादकच आला नाही. त्यामुळे राज्यपालांचे अभिभाषणाचा मराठीतील अनुवाद सदस्यांना ऐकायला मिळाला नाही. अखेर ही बाब शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या लक्षात येताच त्यांनी धाव घेत राज्यपालांच्या भाषणाचा मराठीत अनुवाद वाचून दाखविण्यास सुरुवात केली. त्यामुळे राज्य सरकारवर ओढावलेली नामुष्की तात्पुरती टळली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages