Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

म्हाडाचा समाज मंदिर हॉल कंत्राटदाराच्या घश्यात घालण्याचा डाव


गृहनिर्माण मंत्री आणि म्हाडाविरोधात संतापाची लाट -
मुंबई । प्रतिनिधी -
घाटकोपर पंतनगर येथील म्हाडा वसाहतीतील समाज मंदिर हॉल म्हाडाने ई निविदा काढून खाजगी कंत्राटदाराच्या घशात घालण्याचा डाव आखला आहे. समाज मंदिर हॉल कंत्राटदाराच्या घश्यात घालण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. समाज मंदिराचे सर्व अधिकार म्हाडाने आपल्या जवळच ठेवून सर्वसामान्यासाठी हॉल नाममात्र किंमतीत उपलब्ध करावा अशी येथील रहिवाशांची मागणी आहे. त्यासाठी स्थानिक रहिवाश्यांनी सह्यांची मोहीम राबवली असल्याची माहिती स्वराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप राणे यांनी दिली आहे.

घाटकोपर पंत नगर म्हाडा वसाहतीत समाज मंदिर हॉल ५० वर्षापासून नाममात्र दरात लग्न कार्य व इतर सांस्कृतिक कार्यासाठी वापरण्यास दिला जात होता. मागील १५ वर्षांपासून हा हॉल स्थानिक रहिवाश्यांसाठी बंद आहे. १५ वर्षांनंतर समाज मंदिर हॉलच्या जागेत टोले जंग टॉवर उभा राहिला आहे. हॉलच्या जागेच्या बदल्यात उपलब्ध झालेला समाज मंदिर हॉल म्हाडाने टेंडर पद्धतीने खाजगी व्यावसायिकाच्या घशात घालण्याचा डाव आखला आहे. त्यासाठी म्हाडाकडून जानेवारी महिन्यात एका वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. खासगी कंत्राटदाराच्या घश्यात हा हॉल गेल्यास स्थानिक रहिवाशांना कमीतकमी ५० हजार ते १ लाख रुपये भाडे व कॅटरिंगचा खर्च (मोनोपॉली) वेगळा असे एकूण २ ते ३ लाख खर्च करावे लागणार आहेत. च्या घरात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा खर्च परवडणार नसल्याने स्थानिक रहिवाश्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

भारताचे माजी पंतप्रधान गुलजारीलाल नंदा यांनी सर्वसामान्य जनतेला शहरात निवारा मिळावा म्हणून गृहनिर्माण वसाहतीची योजना आणली होती त्या योजनेलाच म्हाडाकडून हरताळ फासला जात आहे. शासनाच्या या धोरणाचा विरोध करण्यासाठी व समाज मंदिर हॉल खासगी कंत्राटदाराच्या घश्यात घालण्याचा डाव उधळून लावण्यासाठी पंत नगरमधील ३१५ इमारतींमधील रहिवाशी एकत्र आले आहेत. समाज मंदिर हॉलचा वापर सर्वसामान्यासाठी नाममात्र किंमतीत व्हावा आणि याची संपूर्ण जबाबदारी म्हाडाकडे असावी, समाज मंदिर हॉल खासगी कंत्राटदाराला देण्यासाठी म्हाडाने काढलेली ई निविदा रद्द करावी, समाज मंदिर हॉल स्थानिक नागरिकांना नाममात्र दरात उपलबध व्हावा, कंत्राटदाराची मोनोपॉली करू नये इत्यादी मागण्यांसाठी स्वराज प्रतिष्ठान व स्वराज समाज मंदिर हॉल बचाव समितीच्यावतीने पंत नगर शिवराज चौक येथे म्हाडा विरोधात सह्यांची मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत पंत नगरमधील रहिवाश्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याची माहिती राणे यांनी दिली आहे.

स्थानिक आमदार व गृहनिर्माण मंत्र्यांविरोधात संताप - 
घटकोपर पूर्व येथील स्थानिक आमदार व गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्याशिवाय घाटकोपर पंतनगरमधील विकासकांचे कोणतेही काम होत नाही. येथील अनेक इमारतींचा विकास प्रकाश मेहता यांच्या मर्जीतील विकासकाला काम मिळावे म्हणून रोखून ठेवला आहे. म्हाडाच्या समाज मंदिर हॉलच्या जागेवर प्रकाश मेहता यांचा डोळा होता. हा हॉल पडून येथे टॉवर उभारण्यात आला आहे. टॉवरचे काम सुरु असताना एका विशिष्ट भाषिक लोकांनाच टॉवरमधील जागेमध्ये धार्मिक प्रार्थना आणि कार्यक्रम करण्यास दिले जात आहेत. यावरून हा हॉलही सामान्य लोकांना उपलब्ध होऊ नये याची पुरेपूर काळजी गृहनिर्माण मंत्र्यांनी घेतली असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom