बेस्टच्या ताफ्यात इलेक्ट्रिक वातानुकूलित मिडी बसगाड्या - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 March 2018

बेस्टच्या ताफ्यात इलेक्ट्रिक वातानुकूलित मिडी बसगाड्या


मुंबई । प्रतिनिधी - केंद्र सरकारच्या फेम इंडिया योजनेअंतर्गत बेस्टने आपल्या ताफ्यात ४० मिडी वातानुकूलित बसगाड्या सात वर्षांच्या कालावधीसाठी भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारद्वारे प्रत्येक बसमागे ६० टक्के अनुदान बेस्टला दिले जाणार आहे. संपूर्णपणे विजेवर चालणाऱ्या या मिडी वातानुकूलित बसगाड्या असून एम. पी. इंटरप्रायझेस त्याचा पुरवठा करणार आहे.

या आधीही बेस्ट समितीने २० बिगर वातानुकूलित बसगाड्या व २० वातानुकूलित मिडी इलेक्ट्रिक बसगाड्याफेम इंडिया योजनेअंतर्गत भाडेतत्वावर घेण्यासाठी मान्यता दिली होती. फेम इंडिया योजनेअंतर्गत आणखी १०० बसगाड्या खरेदी करण्यासाठी बेस्टने आपला प्रस्ताव दिला होता. मात्र ४० बसगाड्यांनाच संमती मिळाली असून एका बसगाडीची किंमत सरासरी १ कोटी ६७ लाख रुपये आहे. त्यातील १ कोटी रुपये बेस्टला अनुदान स्वरूप मिळणार आहेत. एकूण ४० कोटी रक्कम बेस्टला मिळणार आहे. या बसगाडीच्या बॅटरीचा खर्च बसच्या किंमतीच्या ६० टक्के आहे. या बसगाड्यांमध्ये आयात केलेल्या महागडे भाग बसविण्यात आले असून हे तंत्रज्ञान भारतात नवीन आहे. बसच्या आयुर्मानाबद्दल अनिश्चितता असून बसगाड्या दुरुस्त्या करण्यासाठी बेस्टकडे प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नसल्याने बेस्टने बसगाड्या स्वतः खरेदी न करता भाडेतत्वार घेण्याचे ठरविले आहे.

बसगाडीची वैशिष्ठे - 
- संपूर्ण वातानुकूलित बसगाड्या
- बस रस्त्यावरून जात असताना बाहेर धूर सोडत नाहीत
- बस गाडयांना कमीत कमी आवाज असल्यामुळे बस प्रवाशांना आवाज विरहित प्रवासाचा सुखद अनुभव
- बसगाड्याना इतर बसगाड्यांची तुलनेत कमी देखभालीची आवश्यकता असते .
- बसगाडीच्या प्रवर्तनामध्ये घट

Post Bottom Ad