Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मंडयांतील गाळ्यांचे भाडे दुप्पट करण्यास स्थायी समितीची मंजुरी


मुंबई - महापालिका मंडयांतील गाळ्यांच्या भाड्यात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. तब्बल १७ वर्षांनी ही भाडेवाढ करण्यात आली आहे. ग्राहक आणि व्यावसायिकांना दर्जेदार सोयीसुविधा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. स्थायी समितीच्या बैठकीत भाडेवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. 

दरवर्षी 10 टक्के भाडेवाढ होणार असून गाळेधारकांना यापुढे वार्षिक शुल्क ४०० रुपये भरावे लागणार आहेत.
पालिका मंडयांमध्ये विक्रेते आणि ग्राहकांच्या सोयीसाठी वीज, पाणी, शौचालय अशा सुविधा दिल्या जातात. यासाठी पालिकेला मोठ्या प्रमानावर खर्च करावा लागतो. यामध्ये पालिका मंडयांवर वर्षाला ७० कोटी ७० लाख रुपये खर्च करते. मात्र या गाळ्यामधून केवळ १७ कोटी ८० लाखांचे उत्पन्न मिळते. तरीदेखील उत्पन्न मिळवण्याच्या उद्देशाने नव्हे तर सेवा देण्यासाठी पालिका काम करीत असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले. आगामी काळात पालिका मंडयांमध्ये मोठ्या प्रमाणात दर्जेदार सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. त्यामुळे ही भाडेवाढ करण्यात येत असल्याचे प्रशासनाने सांगितले. अखेर या प्रस्तावाला बहुमताने मंजुरी देत असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी जाहीर केले.

सोयी सुविधाही पुरावा-
वाढलेली महागाई आणि प्रस्तावित सुधारणांसाठी भाडेवाढीच्या प्रस्तावाला पाठिंबा देत असल्याचे सभागृह नेते यशवंत जाधव यांनी सांगितले. मात्र ही भाडेवाढ करताना प्रशासनाने नागरिक आणि विक्रेते यांना चांगल्या सुविधा मिळतात की नाही यावर देखरेख ठेवावी अशी मागणीही त्यांनी केली. 

अशी असेल शुल्कवाढ --
प्रकार- सध्याचे -प्रस्तावित शुल्क
वस्तु विकण्यासाठी -200--400
रिकाम्या टोपल्या हटविण्यासाठी -1500--3000
गोठवलेले मास आणि मासळी - 1500-3000
ताजे मांस आणि मासळी - 1500-3000
खासगी बाजारातील मासांची दुकाने - 1000 ---2000
खासगी बाजारातील कोबड्यांच्या दुकानास - 500--1000
खासगी बाजारात कोंबड्या ठेवण्यास-- 1000---2000
अनुज्ञापन शुल्कातील वाढ -
प्रकार - सध्याचे शुल्क- प्रस्तावित शुल्क
सर्व प्रकारच्या वस्तुंच्या दलालीसाठी(जागेशिवाय) - 1500-3000
जागेसह - 1600-3200
उपदलालीसाठी अनुज्ञापन जागेशीवाय - 1400 --- 2800
जागेसह - 1500---3000
पालिका बाजारातील हुंडेकरांसाठी - = 1500- 3000

अनुज्ञापन हस्तांतरणासाठी -
खासगी बाजारातील व्यापाऱ्यांच्या कादेशीर वारसाव्यतिरीक्त ---किमान 3000 --- किमान 6000
घाऊक दलाल उपदलाल,हुंडेकरी (कायदेशीर वारसांसाठी)-1000--4000(दोन हजार प्रशासकीय आकार )
कादेशीवर वारससोडून (जागेसह)-50हजार --एक लाख
जागेशिवाय - 30 हजार ---60 हजार

Top Post Ad

Below Post Ad

Voter Information & Services

Ads Bottom