नवी मुंबईत वर्ल्ड हेड इंजुरी अवेरनेस दिन साजरा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नवी मुंबईत वर्ल्ड हेड इंजुरी अवेरनेस दिन साजरा

Share This
वाशी - नवी मुंबई वाहतुक विभाग, आरटीओ व हिरानंदानी रूग्णालय, वाशी यांच्या सहयोगाने जागतिक हेड इंजुरी अवेरनेस दिन अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून दुचाकीस्वार तसेच पादचारी यांच्यामध्ये रस्ते सुरक्षा, हेलमेट्स घालूनच वाहन चालवणे, चार चाकी धारकांनी सिटबेल्ट लावून वाहन चालविणे, प्रत्येक चालकाने वाहतुकीची शिस्त पाळावी यासाठी संबंध दिवसभर ट्रॅफिक असणाऱ्या चौकात नागरीकांना तसेच चालकांना थांबवून नियमांविषयी माहिती देऊन पुस्तिका व रस्ते सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. यावेळी वाशी वाहुतक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सतीश गायकवाड, तसेच डॉ. चंद्रशेखर तुळसकर, इंटेन्सिविस्ट तसेच फोर्टिस रुग्णालयाच्या अति दक्षता विभागाचे प्रमुख तसेच पोलिस व रूग्णालयातील अधिकारी वर्ग उपस्थित होते. यावेळी ४०० हून अधिक दुचाकीस्वार व पादचा-यांना मार्गदर्शन करण्यात आले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages