महिला दिनानिमित्‍त महिला प्रसारमाध्‍यम प्रतिनिधींचा महापौरांच्‍या हस्‍ते सत्‍कार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महिला दिनानिमित्‍त महिला प्रसारमाध्‍यम प्रतिनिधींचा महापौरांच्‍या हस्‍ते सत्‍कार

Share This

मुंबई । प्रतिनिधी - जागतिक महिला दिनानिमित्‍त बृहन्‍मुंबई महापालिकेचे वृत्‍तसंकलन करणाऱया महिला प्रसारमाध्‍यम प्रतिनिधींचा महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्‍या हस्‍ते पुष्‍पगुच्‍छ व भेटवस्‍तु देऊन महापालिका मुख्‍यालयातील महापौर दालनात सत्‍कार करण्‍यात आला.

प्रसारमाध्‍यम प्रतिनिधींशी संवाद साधताना महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर म्‍हणाले की, आजच्‍या युगात महिलांची भूमिका महत्‍वपूर्ण असून आपण महिला प्रसारमाध्‍यम प्रतिनिधी म्‍हणून समाजात खुप मोठी भूमिका पार पाडीत असल्‍याचे महापौरांनी सांगितले. त्‍यासोबतच आपल्‍या ज्ञानाच्‍या कक्षा अधिक रुंदावण्‍यासाठी अधिकाअधिक दर्जेदार पुस्‍तकांचे वाचन करण्‍याची सुचना सुध्‍दा महापौरांनी यावेळी प्रसारमाध्‍यम प्रतिनिधींना केली. प्रसारमाध्‍यम प्रतिनिधींच्‍या विविध प्रश्‍नांची महापौरांनी यावेळी दिलखुलास उत्‍तरे देऊन त्‍यांच्‍या शंकाचे समाधान केले. यावेळी इंद्रायणी नार्वेकर, निर्मला ढेपे, रिचा पिंटो, स्विटी आदिमुलम, स्‍टेफी थेवर, सुजाता ठाकुर, अनिता शुक्‍ला, राधिका यादव, सपना देसाई, मनश्री पाठक व उनाईजा या महिला प्रसारमाध्‍यम प्रतिनिधींचा महापौरांच्‍या हस्‍ते पुष्‍पगुच्‍छ व भेटवस्‍तु देऊन सत्‍कार करण्‍यात आला. या प्रसंगी विधी समिती अध्‍यक्ष अॅड. सुहास वाडकर, जनसंपर्क अधिकारी विजय खबाले- पाटील, महापालिका वार्ताहर संघाचे अध्‍यक्ष विष्‍णु सोनावणे, सरचिटणीस श्रीरंग सुर्वे व महापालिका चिटणीस प्रकाश जेकटे हे मान्‍यवर उपस्थित होते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages