नापास विद्यार्थ्यांना पास करण्याचा उपक्रम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 March 2018

नापास विद्यार्थ्यांना पास करण्याचा उपक्रम


मुंबई । प्रतिनिधी - हुशार विद्यार्थ्यांना सर्वच जवळ करतात आणि कौतुकही करतात पण जेव्हा विद्यार्थी नापास होतात त्यांना ना कौटुंबिक सदस्य जवळ करतात ना कोणी मित्रमंडळी. अश्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या खाजगी परीक्षेला बसवित उत्तीर्ण करण्याचा उपक्रम गेल्या 4 वर्षांपासून साकीनाका विभागातील गुरुकुल कोचिंग क्लासेस राबवित आहेत.

साकीनाका येथील प्रभात नगरमधील गुरुकुल क्लासेस संचालित करणारे कैलास आगवणे आणि बाबू बतेली यांस नापास विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्राचार्य रवि नायर यांनी प्रोत्साहन दिले. चौथ्या वर्षांच्या 70 विद्यार्थ्यांना निरोप समारंभ प्रसंगी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थी आणि विद्यार्थीनी कोणती दक्षता बाळगणे आवश्यक आहे, याची माहिती दिली. गलगली पुढे म्हणाले की प्रत्येक वर्षी जवळपास 90 टक्के विद्यार्थी आणि विद्यार्थीनी उत्तीर्ण होत आहेत. या उपक्रमामुळे नापास विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यात शिकण्याची नवीन जिद्द तयार होत असून आत्महत्या किंवा अन्य नकारात्मक विचार मनात येत नसल्याचे मनोगत व्यक्त करत आपल्या भावना मांडल्या. यावेळी विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Post Bottom Ad

JPN NEWS