बेस्टमध्ये जागतिक नागरीक संरक्षण दिन साजरा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्टमध्ये जागतिक नागरीक संरक्षण दिन साजरा

Share This

मुंबई । प्रतिनिधी - बेस्ट उपक्रमाच्या कुलाबा आगारातील बेस्ट भवन येथे सुरक्षा व दक्षता विभागातर्फे जागतिक नागरीक संरक्षण दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी नागरीक संरक्षण याबाबतची शपथ घेतली. तसेच मान्यवरांनी नागरीक संरक्षण बाबतचे महत्व उपस्थित सर्व कामगार व अधिकारी यांना समजावून सांगितले. सदर कार्यक्रमास बेस्ट उपक्रमाचे उप महाव्यवस्थापक आर. ज.सिंग, सहाय्यक महाव्यवस्थापक (स्थापत्य) संजय खाचने, विद्युत पुरवठा विभागाचे उप मुख्य अभियंता दिनेशकुमार ओहळ, वाहतूक विभागाचे आगार व्यवस्थापक सदानंद शेट्टी, उप मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी (वरिष्ठ) विजय सोनावणे व बेस्ट उपक्रमाचे वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तदनंतर बेस्ट उपक्रमाच्या कुलाबा आगारात नागरीक संरक्षण कसे करावे याबाबतची प्रात्याक्षिक बेस्ट कामगारांच्या माहितीसाठी सादर करण्यात आली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages