अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका - शिक्षण विभाग - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका - शिक्षण विभाग

Share This

मुंबई । प्रतिनिधी - बांद्रा ते दहिसर येथील कार्यक्षेत्रात काही संस्थांनी शासनाची परवानगी न घेता अनधिकृत शाळा सुरु केलेल्या आहेत. सदर अनधिकृतपणे सुरु असलेल्या शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांना प्रवेश घेवू नये असे आवाहन शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई, पश्चिम विभाग यांनी केले आहे.

शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर पालकांकडून मुलांच्या प्रवेशासाठी गर्दी होते. यावेळी शाळांच्या मान्यतेबाबत माहिती न घेता प्रवेश घेतला जातो. त्यामुळे पालकांनी सावध होऊन अशा अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये. अनधिकृतपणे सुरु असलेल्या शाळांमध्ये पालकांनी त्यांच्या पाल्यांसाठी प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस ते स्वत: जबाबदार असतील असेही शालेय शिक्षण विभागाच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

अनधिकृत शाळांची यादी --
1 एच : नवजीवन ग्लोबल स्कूल, एमआयजी कल्ब शेजारी, बांद्रा (पू), मुंबई. सीबीएसई ज्यु.केजी ते 1 ली इंग्रजी
2 केपी-पूर्व, यंग इंडियन हायस्कूल, जोगेश्वरी (पु), मुंबई. एस.एस.सी. इ.5 ते 9 इंग्रजी
3 केपी-पूर्व, किडस किंगडम हायस्कूल, ऑर्केड मॉल, रॉयल पाम, आरे कॉलनी, गोरेगाव, (पु), मुंबई. एस.एस.सी. इ. 1 ते 9 इंग्रजी
4 केपी-प : पोअर्ल ॲन्ड कोबलम इंग्लिश स्कूल, मिल्लत नगर, अंधेरी (पू), मुंबई. एनआयओएस, इ. 1 ते 5 इंग्रजी
5 केपी-प : एतमत हायस्कूल, मोतीलाल नगर-1, गोरेगाव, (प.) एस.एस.सी. इ.8,9,10 इंग्रजी
6 केपी-प : बेलवर्डर इंटरनॅशनल स्कूल, अंधेरी (प), मुंबई. आयजीसीएसई इ. 1 ते 10 इंग्रजी
7 पी : होली सदर इंग्लिश स्कूल, कुरार व्हिलेज, मालाड (पु.) एस.एस.सी. इ. 8 इंग्रजी
8 आर-पूर्व : डी.व्ही.एम.हायस्कूल, पोयसर, कांदीवली (पू), मुंबई. एस.एस.सी. इ.9 इंग्रजी
9 आर-पूर्व : विद्याभूषण हायस्कूल, रावलपाडा, दहीसर, (पु) एस.एस.सी. इ. 9 इंग्रजी
10 आर-पश्चिम : मारीया हायस्कूल, गणेश नगर, कांदीवली, (प), मुंबई. एस.एस.सी. इ. 9 ते 10 इंग्रजी
11 आर-पश्चिम : साई ॲकडमी, गणेश नगर, कांदीवली, (प), मुंबई. एस.एस.सी. इ. 9 इंग्रजी
12 आर-पश्चिम : ब्राईट लाईट हायस्कूल, भाब्रेकर नगर, कांदीवली (प) एस.एस.सी. इ. 9 ते 10 इंग्रजी
13 आर-पश्चिम : एस.के.भाटीया, हायस्कूल, साईबाबा नगर, बोरीवली (प) एस.एस.सी. इ. 9 इंग्रजी
14 आर-पश्चिम शिवशक्ती हायस्कूल, गणेश नगर, बोरीवली (प) एस.एस.सी. इ. 9 ते 10

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages