मुंबई । प्रतिनिधी - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लाखो अनुयायी चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी येतात. बाबासाहेबांना अभिवादन केल्यावर हे अनुयायी बाबासाहेबांचे घर असलेले राजगृह, बोरिवली येथील कान्हेरी गुफा, गोराई येथील पॅगोडा येथे भेटी देत असतात. या अनुयायांच्या सोयीसाठी बेस्टने विशेष गाड्यांचे आयोजन केले आहे.
दादर फेरी २ ही बस दादर स्टेशन ते शिवाजी पार्क दरम्यान सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत, बस क्रमांक १८८ ही बस बोरिवली स्टेशन ते कान्हेरी गुंफा दरम्यान सकाळी ८ ते संध्याकाळी ७ पर्यंत, बस मार्ग क्रमांक २७१ ही बस मालाड स्टेशन ते मार्वे बीच दरम्यान सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत, बस मार्ग क्रमांक २४७ व २९४ या बस बोरिवली स्टेशन ते गोराई खाडी दरम्यान सकाळी ९ ते रात्री 10 या वेळेत चालवल्या जाणार आहेत. तसेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईमधील स्मृती स्थळाला भेट देण्यासाठी विशेष स्थळ दर्शन बस फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. शिवाजी पार्क येथून चालणाऱ्या या बसेससाठी प्रति प्रवासी १५० रुपये प्रवास भाडे घेतले जाणार आहे. या विशेष फेऱ्या सकाळी ८, ८.३०, ९, ९.३० व १० वाजता चालवण्यात येणार आहेत, माटुंगा परिसरातील राजगृह व वडाळा येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयला भेट देणाऱ्या अनुयायांसाठी सकाळी ८ ते रात्रौ ९ पर्यंत वीर कोतवाल उद्यान (प्लाझा) येथून बसेस सोडण्यात येणार आहेत. स्थळदर्शन बसफेऱ्यांची तिकीटे चैत्यभूमी, शिवाजी पार्क बसचौकी आणि वीर कोतवाल उद्यान प्लाझा येथे उपलब्ध केली जाणार आहेत.
No comments:
Post a Comment