महापालिका रुग्णालयांमधील आयसीयुच्या 200 बेड्सचे कंत्राट खासगी संस्थांना - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 April 2018

महापालिका रुग्णालयांमधील आयसीयुच्या 200 बेड्सचे कंत्राट खासगी संस्थांना

मुंबई - मुंबई महापालिकेच्या घन कचरा विभाग, शाळा, रुग्णालये आणि कार्यालयांमधील हाऊसकिपिंगचे काम खासगी संस्थांच्या हवाली करण्यात आले आहे. यानंतर आता पालिका रुग्णालयातील आयसीयू खासगी संस्थांच्या हवाली केले जाणार आहेत. पालिका रुग्णालयांत डॉक्टरांची कमतरता आहे. रुग्णांचे हाल होऊ नये यासाठी आयसीयुचे 200 बेड्सचे कंत्राट खासगी संस्थांना देण्याचा प्रस्ताव भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्षाने बहुमताने दफ्तारी दाखल केला. मात्र त्यानंतर उर्वरित तीन प्रस्ताव विरोधाला न जुमानता सत्ताधारी शिवसेनेने मंजूर केले. त्यामुळे संतापलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीने सभात्याग केला.

मुंबई महापालिकेत काही महिन्यांपूर्वी कचरा वाहतूक तसेच हाऊस किपिंगचे काम खासगी कंत्राटदारांना दिल्यानंतर वाद रंगला होता. आता पालिकेच्या रुग्णालयात 33 विशेष डॉक्टरांच्या जागा कमी आहेत. डॉक्टर पालिकेच्या रुग्णालयांत काम करण्यास तयार होत नाहीत. या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत, मात्र तोपर्यंत रुग्णांचे हाल होतील असे कारण पुढे करीत दोन वर्षासाठी खासगी संस्थांना कंत्राट देण्याचे 4 प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीत मंजुरीसाठी आणले होते. 12 रुग्णालयांत 200 आयसीयू बेड्सचा हा प्रस्ताव आणला होता. यावर पालिका रुग्णालयांत खासगीकरण करण्याचा घाट प्रशासनाचा असल्याचे सांगत विरोधीपक्ष नेते रवी राजा यांनी उपसूचना मांडून प्रस्तावाला विरोध केला. या उपसूचनेला भाजपासहीत सपा, राष्ट्रवादी काँग्रेसने पाठींबा दिला. खासगी डॉक्टर येथील रुग्ण आपल्या क्लीनिकमध्ये नेतील अशी भीती भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी व्यक्त केली. बाहेरच्या डॉक्टरांना पालिका रुग्णालयात सेवा देण्याची परवानगी मिळते मग पालिकेच्या डॉक्टरांना बाहेर सेवा देण्यास परवानगी का दिली जात नाही. मागील तीन वर्ष 16 रुग्णालयांवर आपण च्रर्चा करीत होतो. असे असताना आता बेड्स चालवायला देतो आहोत. त्यांना किती अनुभव आहे, असा सवाल विचारत हे डॉक्टर येथील रुग्ण आपल्या क्लिनीक मध्ये वळवतील, असे सांगत कोटक यांनी प्रस्तावाला विरोध केला. यावर शिवसेनेच्या नगरसेविका राजुल पटेल यांनी राजा यांच्या उपसूचनेला विरोध करीत प्रस्ताव मंजूर झाला नाही तर रुग्णांचे हाल होतील, त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर करा अशी जोरदार मागणी केली. यावर डॉक्टरांची पदे सहा महिन्यांत भरण्याचे आश्वासन प्रशासनाने द्यावे, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक रमेश कोरगावकर यांनी केले. याला शिवसेनेच्या नगरसेवकांनी पाठिंबा देत प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी केली. आयुक्तांनीही दहा महिन्यांत पदे भरली जातील असे आश्वासन दिले. मात्र भाजपसहीत विरोधीपक्ष आपल्या विरोधाच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने चारपैकी एका प्रस्तावावर मतदान घेण्यात आले. बहुमताने रविराजा यांची रेकॉर्ड करण्याची उपसूचना मंजूर करण्यात आली. मात्र उर्वरित तीन प्रस्ताव विरोधाला न जुमानता अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मंजूर केल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीने सभात्याग केला.

रग्णालयांची नावे -
भाभा रुग्णालय, बांद्रा
व्ही एन देसाई रुग्णालय, सांताक्रूझ
हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर, जोगेश्वरी
सिद्धार्थ रुग्णालय, गोरेगाव
डॉ. आंबेडकर रुग्णालय, कांदिवली
भगवती रुग्णालय, बोरीवली
राजावाडी रुग्णालय, घाटकोपर
भाभा रुग्णालय, कुर्ला
संत मुक्ताबाई रुग्णालय, घाटकोपर
मालविया रुग्णालय, गोवंडी
फुले रुग्णालय, विक्रोळी
अग्रवाल रुग्णालय, मुलुंड

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad