मुंबई - मुंबई महानगरपालिकेची अनेक विकास कामे सुरु असतात. त्यापैकी काही ठिकाणी अयोग्य कामे होत असल्याचे प्रकार माहिती अधिकारातून उघड झाले आहेत. याबाबत पालिकेच्या विविध कार्यालयात तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यानंतरही प्रशासनाकडून कंत्राटदारांना वाचवण्यासाठी कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. माहिती अधिकारात मिळवलेल्या कागदपत्र आणि तक्रारी यांना केराची टोपली दाखवली जात असल्याने साप्ताहिक संपादक राज्य पत्रकार संघ या संघटनेच्यावतीने आज (बुधवारी १८ एप्रिलला) मुंबईच्या आझाद मैदानात एक दिवसीय उपोषण केले जाणार आहे, यावेळी प्रदेश अध्यक्ष लक्ष्मण शिंदे, उपाध्यक्ष महेबूब फकीर, सहसचिव नरसिंग खिचडे, इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती मुंबई अध्यक्ष आनंद पारगांवकर यांनी दिली आहे. या उपोषणा दरम्यान पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन निवेदन दिले जाणार असल्याची माहिती पारगांवकर यांनी दिली.

No comments:
Post a Comment