मुंबईकरांना घरात मनासारखे बदल करता येणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईकरांना घरात मनासारखे बदल करता येणार

Share This

कोळीवाडे, गावठाणांनाही होणार फायदा -
मुंबई - मुंबईचा वीस वर्षाचा आराखडा मंजूर झाला आहे. या आराखड्याच्या माध्यमाने छोट्या घरात राहणाऱ्या सामान्य मुंबईकरांना तसेच कोळीवाडा गावठाणात राहणाऱ्या मूळ मुंबईकरांना याचा फायदा होणार आहे. डीपी आणि डीसीआर मध्ये करण्यात आलेल्या बदलामुळे नागरिकांना आपल्या घरात बदल करून आपल्या मनासारखे घर बनवणे शक्य होणार आहे. तर ज्या कोळोवाडे आणि गावठाणामधील घरे दुरुस्त केल्यास त्यांच्यावर तोडक कारवाई केली जात होती. मात्र आता अशी घरे नियमित होणार असल्याने गावठाणे आणि कोळीवाड्यामधील घरांवर आता कारवाई होणार नाही.

मुंबईच्या मागील विकास आराखड्यात घरामध्ये किचन बंधनकारक करण्यात आले होते. त्यामुळे घरे छोटी असली तरी किचनमुळे घर छोटे वाटत असे. घर मालकाला त्यात बदल करावयाचं झाल्यास बदल करता येत नव्हता. मात्र नव्या आराखड्यात किचनचे बंधन काढून टाकण्यात आले आहे. किचन नको असल्यास ती जाग राहण्यासाठी किंवा इतर कामासाठी वापरता येऊ शकणार आहे. किचनच्या ऐवजी फक्त ओटा लावून घरात किचन बनवता येणार आहे. राहण्यासाठी जागा कमी असल्याने घराचा मालक आपल्या इच्छेनुसार घरात बदल करू शकणार आहे. घरात बदल करताना घर मालकांना स्ट्रक्चरल बदल करता येणार नाहीत तसेच शौचालय आणि बाथरूमच्या पाणी वाहून नेण्याच्या मार्गात मात्र बदल करता येणार नाहीत. तसेच घरात बदल करताना सर्व ठिकाणी सूर्यप्रकाश व खेळती स्वच्छ हवा येईल याची काळजी घरमालकाला घ्यावी लागणार आहे. मूळ मुंबईकर राहत असलेल्या कोळीवाडा किंवा गावठाणाला नव्या विकास आराखड्यात विशेष महत्व देण्यात आले आहे. गावठाण आणि कोळीवाड्यात जुनी घरे आहेत. ही घरे दुरुस्त केल्यास त्यांच्यावर पालिका कारवाई करत असे. आता मात्र आराखड्यात गावठाणात छोटे रस्ते असल्यास १.५ एफएसआय दिला जाणार आहे. तर ९ मीटरचा रस्ता असल्यास २ एफएसआय दिला जाणार आहे. यामुळे गावठाण आणि कोळीवाड्यातील घरे दुरुस्त केली असल्यास किंवा उंच केली असल्यास त्यांना पालिकेकडून नियमित करून घ्यावे लागणार असल्याने मूळ मुंबईकरांवर होणारी कारवाई थांबणार आहे.

एसआरमधील रहिवाशांना दिलासा - 
एसआरएमधील रहिवाश्याना मोकळा श्वास घेता यावा तसेच स्वच्छ प्रकाश त्यांच्या घरात यावा म्हणून विकास आराखड्यात काही बदल सुचवण्यात आले आहेत. एसआरएची इमारत ३२ मीटर उंच असल्यास आधी १.५ मीटर ते ६ मीटरच्या अंतराची मर्यादा होती त्यात बदल करून दोन इमारतीमध्ये कमीत कमी ३ मीटरचे अंतर ठेवण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. इमारतीची उंची ३२ मीटर पेक्षा जास्त असल्यास ६ मीटर तर ७० मीटरपेक्षा जास्त उंची असल्यास ९ मीटरचे अंतर ठेवावे लागणार आहे. तसेच कंपाऊंड वॉलपासून इमारतीच्या भिंतीमधील अंतर ३ मीटर ठेवावे लागणार आहे. यामुळे एसआरएमध्ये राहणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages