मुंबई - पावसाळयात मुंबईमधील गर्दीच्या ठिकाणी मॅनहोल उघडे राहणार नाहीत तसेच मॅनहोलला जाळ्या लावण्यात आल्याची काळजी घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सर्व विभागातील सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.
मुंबई महापालिका आयुक्तांकडून दरमहिन्याला आढाव बैठक घेण्यात येते या बैठकीत हे आदेश देण्यात आले आहेत. महापालिका मुख्यालयात आयोजित आढावा बैठकीला अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए. कुंदन, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल, अतिरिक्त आयुक्त (शहर) आबासाहेब ज-हाड, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) रमेश पवार यांच्यासह महापालिकेचे सर्व संबंधित उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व विभाग प्रमुख आदी उपस्थित होते. गेल्या पावसाळ्यात मुंबईची तुंबई झाली होती. मुंबईत पाणी साचल्याने मॅनहोल उघडण्यात आले होते. त्यापैकी एका मॅनहोलमध्ये पडून सुप्रसिद्ध डॉक्टर अमरापूरकर यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर न्यायालयाने फटकारल्यानंतर मुंबईतील सर्व मॅनहोलला जाळी लावण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला होता. त्यानुसार रेल्वे स्टेशन जवळील परिसर, मंडई, चित्रपट, नाट्य गृहे इत्यादी वर्दळीच्या ठिकाणी आणि पाणी साचण्याची शक्यता असणाऱ्या ठिकाणांपैकी ज्या ठिकाणी मॅनहोलच्या झाकणांखाली जाळ्या लावण्याचे ठरले होते, त्या ठिकाणी जाळ्या बसविण्यात आल्याची तसेच मॅनहोलवर झाकणे असल्याची खात्री करून घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. त्याचबरोबर आपल्या विभागात मॅनहोलवरील झाकणांचा पुरेसा साठा असल्याची खात्री करवून घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
No comments:
Post a Comment