केंद्रात आणि देशातील काही बहुसंख्य राज्यांत भाजपचे सरकार सत्तेवर आहे. हे सरकार सत्तेवर आल्यापासून हे समाज भयभीत झाले आहेत. पक्ष्याच्या नावावर काही हिंदुत्ववादी युवक त्यांना टार्गेट करून देशाला रक्तरंजित करू पाहत आहेत. यासाठी धर्मांध तरुणांना पोलीस आणि सरकारकडून पाठबळ मिळत आहे. अनेक ठिकाणी तर पोलिसांसमोर अल्पसंख्याक आणि दलितांना मारहाण केली जात आहे. पोलिसांकडूनच त्यांच्या गाड्यांची तोडफोड झाल्याच्या व्हिडीओ क्लिपही सोशल मिडीयावर व्हायरल झाल्या आहेत. त्यामुळे देशभरातील दलित-अल्पसंख्यांक भीतीच्या वातावरणात जगत आहेत. देशाची परिस्थिती अधिक भयावह होण्याआधीच देशाचे प्रमुख म्हणून राष्ट्रपती या नात्याने याकडे गांभीर्याने लक्ष घालावे, तसेच भयभीत झालेल्या दलित समाजाला भयमुक्त करावे, दलितांच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आलेला ऍट्रोसिटी कायदा अधिक कठोर करावा तसेच खोट्या गुन्ह्यात कारागृहात बंदिस्त असलेले भीम आर्मीचे नेते वकील चंद्रशेखर आझाद यांची मुक्तता करण्याचे आदेश द्यावेत अशा मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिफॉरमिस्ट) चे शिष्टमंडळ राष्ट्रपती कोविंद यांना भेटणार आहे. राष्ट्रपतींच्या भेटीसाठी पक्षाच्यावतीने राष्ट्रपतींना पत्र पाठविण्यात आले आहे. या शिष्टमंडळाचे नेतृत्व नावकर करणार आहेत.
Post Top Ad
11 April 2018
दलित-अल्पसंख्याकांच्या प्रश्नांवर रिपब्लिकन नेते राष्ट्रपतींना भेटणार
Tags
# महाराष्ट्र
# मुंबई
Share This
About Anonymous
मुंबई
Tags:
महाराष्ट्र,
मुंबई
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment