मागासवर्गीय उमेदवारांच्या रिक्त पदांची माहिती संकलित करा - मुख्य सचिव - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 April 2018

मागासवर्गीय उमेदवारांच्या रिक्त पदांची माहिती संकलित करा - मुख्य सचिव


मुंबई - शासकीय विभागातील मागासवर्गीय उमेदवारांच्या खातेनिहाय रिक्त पदांची माहिती संकलित करून मागासवर्ग कक्षाने सादर करावी, असे निर्देश मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी आज संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. 

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी आज मुख्य सचिवांसमोर विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी कास्ट्राईब संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मागासवर्गीय उमेदवारांचा खातेनिहाय रिक्त पदांचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये नगरविकास,महसूल, शालेय शिक्षण, ग्रामविकास, सामाजिक न्याय, सहकार व पणन या विभागातील मागासवर्गीय उमेदवारांच्या अनुशेषाविषयी यावेळी चर्चा करण्यात आली. मागासवर्गीय उमेदवारांच्या अनुशेषाबाबतच्या माहितीचे विस्तृत संकलन विभागांनी करावे. आरक्षण कायद्याच्या तरतुदीनुसार विभागांनी काम करावे, असेही मुख्य सचिवांनी सांगितले. यावेळी मुख्य सचिवांचा कास्ट्राईब संघटनेच्या वतीने शाल व भगवान बुद्धाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad